मुंबई : आपले मुंबईमध्ये स्वतःचे एक घर असावे असे प्रत्येकाला वाटते. मात्र ते प्रत्येकाला शक्य होत नाही. कारण आता घराच्या किंमती सर्वसामान्यांच्या बजेटच्या बाहेर गेल्या आहेत. या सगळ्यात मुंबईत आपलं हक्काचं घर असावे असावं अशी स्वप्न पाहणाऱ्यांना दिलासा मिळतो तो म्हाडामुळे. महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात म्हाडा सर्वसामान्यांना परवडतील असा दरामध्ये घरे उपलब्ध करून देते. यामुळे अनेकजण म्हाडाच्या लॉटरीमध्ये नशीब आजमावताना दिसत असतात. म्हाडाच्या लॉटरीमुळे अनेकांचे घराचे स्वप्न पूर्ण होते. म्हाडाने घेतला मोठा निर्णय येत्या पाच वर्षांत मुंबईत 2.50 लाख नवीन घरे बांधण्याची घोषणा म्हाडाने केली आहे. परवडणाऱ्या घरांच्या किमती 30 टक्क्यांनी कमी करण्याच्या निर्णय देखील म्हाडा घेण्याची शक्यता आहे. यासह म्हाडाची घरे भाडे तत्वार देण्याचा निर्णयदेखील घेतला आहे. म्हाडाच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विविध कारणांमुळे तसेच कादपत्रांची पूर्तता न झाल्यास अनेकांना म्हाडाचे घरं खरेदी करता येत नाही. मुंबईत स्वत:चे घर नसलेले तसेच शिक्षणासाठी आणि कामानिमित्ताने मुंबईत राहणाऱ्यांना भाड्याने घर घेऊन रहावे लागते. अशा लोकांना म्हाडाच्या या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबईत नोकरीसाठी तसेच शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच नोकरी करणाऱ्या महिलांना म्हाडाची घरं भाड्याने दिली जाणार आहेत.