महाबळेश्वर : रोटरी क्लब ऑफ महाबळेश्वरच्या अध्यक्षपदी रो विजय काळे व सचिवपदी रो महेश कोमटी यांची निवड करण्यात आली असून रोटरी क्लबच्या अध्यक्ष,सचिवांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने नुकताच नूतन पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम द बाईक रिसॉर्ट महाबळेश्वर येथील सभागृहात प्रमुख पाहुणे एम डी गोल्ड मेडलिस्ट डॉ संजीव धारिया व असिस्टंट गव्हर्नर रो.दीपक बागडे यांच्या उपस्थिती पार पडला महाबळेश्वर रोटरी क्लब पदग्रहण समारंभाची सुरुवात राष्ट्र्गीत व मान्यवरांच्या हस्ते दीप्रज्वलनाने करण्यात आली रोटरीचे मावळते अध्यक्ष रो दिनेश भिसे यांनी गेले वर्षभर केलेल्या सेवा कार्याचा व उपक्रमांचा आढावा सादर करत रोटरी क्लब च्या सदस्यां मुळेच आपण वर्षभर अनेक विविध सेवाभावी उपक्रम सक्षमपणे राबवू शकलो असे मनोगत व्यक्त केले रोटरी क्लब महाबळेश्वरचे नूतन अध्यक्ष रो विजय काळे यांनी मावळते अध्यक्ष रो दिनेश भिसे यांच्याकडून प्रमुख पाहुणे डॉ संजीव धारिया एम डी गोल्ड मेडलिस्ट , रो.दीपक बागडे असिस्टंट गव्हर्नर यांच्या उपस्थितीत आपला पदभार स्वीकारला तसेच सचिव रो महेश कोमटी यांनी देखील आपल्या पदाचा पदभार मावळते सचिव रो विजय काळे यांच्याकडून पदभार स्वीकारला नूतन अध्यक्ष रो विजय काळे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त करताना पुढील वर्षभरात शैक्षणिक तसेच सामाजिक क्षेत्रात रोटरी सदस्यांना सोबत घेऊन काम करणार असल्याचे नमूद करत नवनव्या संकल्पना राबविण्याचा विचार असल्याचे सांगितले तदनंतर रोटरी परिवारा मध्ये नव्याने सामील झालेल्या रो डॉ आशिष चोपडे सी ए मिलींद ढेबे यांचे स्वागत करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे डॉ संजीव धारिया यांनी मनोगत व्यक्त करताना रोटरी क्लब यांच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या सामाजिक कामांबाबत ग्रुपचे कौतुक केले याच बरोबर डब्लू एच ओ ने सांगितल्या प्रमाणे प्रत्येक व्यक्ती ने स्वतःला सोशल ठेवणे गरजेच असून रोटरी या सारख्या ग्रूपच्या तसेच इतर माध्यमातून प्रत्येक माणसाने स्वतःला सामाजिक कार्यात सहभागी करून घेतल्याने आपल्या मनाला तसेच मेंदूला नवसंजीवनी मिळते असे मत त्यांनी या वेळी व्यक्त केले . असिस्टंट गव्हर्नर रो.दीपक बागडे यांनी मनोगत व्यक्त करताना मागील वर्षी महाबळेश्वर रोटरी तर्फे कॅन्सर वरती केलेल्या कामाचे उदाहरण देत वाई विभागात रोटरी वाई मार्फत वाईतील कृष्णा हॉस्पिटल येथे महिला साठी कॅन्सर डिटेक्शन व्हॅन उपलब्ध करून दिली असून या वर्षभरात ही व्हॅन आपण महाबळेश्वर साठी उपलब्ध करून देणार असल्याचे यावेळी सांगितले यातच नवनवीन विचारांचे सभासद रोटरी परिवारात सहभागी करून नवनवीन उपक्रम रोटरी मार्फत व्हावे अशी आयचा व्यक्त केली या वेळी रोटरी परिवारा कढून माखरिया हायस्कूल मधील विद्यार्थ्या साठी डिजिटल क्लासरूम अंतर्गत क्लास सुरू करण्यासाठी संगणक देण्यात आला . याच बरोबर पत्रकारिता क्षेत्रात गेली ३५ वर्षे कार्यरत असणाऱ्या विलास (बापू) काळे यांचा सन्मान करण्यात आला महाबळेश्वर मधील सामाजिक तसेच शैक्षणिक क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या मान्यवर तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचे सन्मान या क्लब च्या वतीने या वेळी करण्यात आले .या कार्यक्रमास शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती शिक्षक विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली या वेळी सूत्रसंचालनाचे काम रो दिनेश भिसे,राजन ढेबे आणि महेश कोमटी यांनी पाहिले तर सदर कार्यक्रम यशस्वी करण्या साठी रोटरी महाबळेश्वर सभासदांनी परिश्रम घेतले.