Gram Panchayat Election : भाजप-शिंदे गटाच्या जास्त जागा आल्या,ते धादांत खोटे – अजित पवार

नागपूर : महाविकास आघाडीला ग्रामपंचायत निवडणुकीत 3 हजार 258 सरपंच पदे तर महाराष्ट्रात सर्वाधिक जागा मिळाल्याची माहिती राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली.
भाजप आणि शिंदे गटाला 3013 सरपंच व इतर 1361आहेत. यामध्ये 761 हे महाविकास आघाडीशी संबंधित आहेत. महाविकास आघाडी आणि मित्र पक्षाचे 4 हजार 019 सरपंच निवडून आले आहेत. अशापद्धतीने महाराष्ट्रात सर्वाधिक जागा महाविकास आघाडीच्या ग्रामपंचायतीत निवडून आल्या आहेत. त्याबद्दल सर्व ग्रामपंचायत सरपंच, सदस्यांचे अजित पवार यांनी अभिनंदन केले.
दरम्यान, या ग्रामपंचायतींचे निकाल लागायच्या अगोदरच भाजप – शिंदे गटाच्या जास्त जागा आल्या असे जाहीर केले ते धादांत खोटे होते. ग्रामीण भागातील जनतेने महाविकास आघाडीच्या पाठी पाठबळ उभे केले आहे असेही अजित पवार यावेळी म्हणाले.
दरम्यान या आनंदाच्या क्षणी महाविकास आघाडीच्या आमदारांनी एकमेकांना पेढे भरवून आनंद साजरा केला.





