प्रशांत जगताप यांच्या पाठीशी महाविकास आघाडी खंबीरपणे उभी – माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर

हडपसर : नगरसेवक ,पुण्याचे महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष म्हणून प्रशांत जगताप यांनी अतिशय चांगले काम केले आहे. त्यांच्या याच कामांचा अनुभव मतदारसंघात फायद्याचा ठरणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडी ही प्रशांत जगताप यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आहे. त्यांनाच विजयी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.असे मत माजी राज्यमंत्री ,काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब शिवरकर यांनी व्यक्त केले.
हडपसर विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत जगताप यांनी उमेदवारी अर्ज छाननीनंतर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार ,काँग्रेस ,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांच्या ज्येष्ठ मार्गदर्शकांची भेट घेत त्यांचे आशीर्वाद घेतले .तसेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधले. यावेळी काँग्रेसचे हडपसर विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रशांत जगताप यांनी नगरसेवक म्हणून या भागात चांगले काम केले आहे. याशिवाय त्यांनी पक्षाचे अध्यक्ष, पुण्याचे महापौर असताना केलेले काम, त्याचा अनुभव ते हडपसर मतदार संघातील विकासाच्या कामात उपयोगात आणतील प्रशांत जगताप यांच्या रूपाने महाविकास आघाडीने एक चांगला उमदा चेहरा उमेदवार म्हणून दिलेला आहे. त्यामुळे त्यांना जास्तीत जास्त मतदान करून विजयी करण्याचे आमचे स्वप्न आहे. असेही माजी राज्यमंत्री शिवरकर यांनी यावेळी सांगितले.
“हडपसर मतदार संघाला समाजवादी विचारांचा वारसा लाभलेला आहे. येथील मतदारांनी कधीही जाती धर्मावर आधारित राजकारणाला खतपाणी घातले नाही. आजही हाच विचार येथे पाहायला मिळतो. गेल्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी हे दाखवून दिले आहे. आमचे राष्ट्रीय अध्यक्ष पवार साहेबांच्या विचारांचा या मतदारसंघाने कायम आदर केला आहे.याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातील प्रत्येक जण माझ्यासाठी झटत आहे. त्यामुळे मला विजयाचा विश्वास आहे.
प्रशांत जगताप
उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष ,हडपसर





