Maha Kumbh Mela 2025 – महाकुंभाची तयारी सुरू असलेल्या उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये विजेची तार ओढताना पुलाचा टॉवर कोसळल्याने अपघात झाला आहे. या अपघातात एकूण पाच कामगार जखमी झाले आहेत. पुलाच्या टॉवरखाली सापडल्यामुळे एका कामगाराला पाय गमवावा लागला. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. दोन मजुरांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. इतर तीन मजुरांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शनिवारी ही घटना प्रयागराजच्या सराई इनायत पोलीस स्टेशन परिसरात घडली आहे. दुर्घटनेनंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. तेथे उपस्थित लोकांनी बचावकार्य सुरू केले. या घटनेत जखमी झालेल्या कामगारांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुलाच्या टॉवरची वायर मशिनद्वारे खेचली जात असताना ही घटना घडली.