महाआघाडी महायुतीला धडा शिकवणार– राष्ट्रवादी काँग्रेस

मुंबई: लोकसभा निवडणूक रिंगणात प्रचारसभेमार्फत प्रत्येक पक्षाने आपले पाय रोवले आहेत. आजपासून महाआघाडीच्या प्रचार मोहिमेला सुरुवात झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टिचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली.

मंगळवार दिनांक २ एप्रिलपासून सर्व प्रसारमाध्यमांवर महाआघाडीची जाहिरात झळकेल. आधी उत्तर द्या, मग मते मागायला या, असा सवाल आम्ही या प्रचार मोहिमेंतर्गत विचारणार आहोत. जनतेच्या मनात जे प्रश्न आहेत त्यावर आधारित ही प्रचार मोहीम असणार, असे मलिक यांनी स्पष्ट केले. महाआघाडी महायुतीला धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा विश्वास नवाब मलिक यांनी वर्तवला.

https://www.facebook.com/NCPSpeaks/videos/2251542018238864/

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.