लोणावळा, – देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत याकरिता लोणावळ्यात भाजपाच्या वतीने भांगरवाडी गणपती मंदिरात महाआरती आयोजित करण्यात आली होती. बुधवारी सायंकाळी ७ वाजता ही महाआरती करीत फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यासाठी श्री गणेशाला साकडे घालण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, ज्येष्ठ नेते अरविंद कुलकर्णी, आशिष बुटाला, महिला अध्यक्षा विजया वाळंज, उद्योजक संदीप भेगडे, माजी नगरसेविका गौरी मावकर आदी पदाधिकारी, महिला, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. विधानसभा २०२४ ही निवडणूक राज्यात महायुतीच्या माध्यमातून लढविण्यात आली. त्यामध्ये भाजपाने देवेंद्र फडणवीस व चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठे यश संपादित केले आहे. भाजपा हा महाराष्ट्रात व महायुती मध्ये सर्वात मोठा पक्ष ठरला असल्याने देवेंद्र फडणवीस हेच महायुतीचे मुख्यमंत्री व्हावेत ही भाजपा कार्यकर्त्यांची भावना असल्याने लोणावळा शहरात भाजपाच्या वतीने महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते.