Ranji Trophy 2025 : केरळच्या टॉप ऑर्डरला महाराष्ट्राच्या गोलंदाजांचा झटका! ३५ धावांवर गमावल्या ३ विकेट्स

MAH vs KER Ranji Trophy Day 2 Match Updates : रणजी करंडकाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्राने केरळविरुद्ध सावध सुरुवात केली होती. महाराष्ट्राने पहिल्या दिवशी 7 बाद 179 धावा केल्या होत्या. दुसरा दिवशी पावसाच्या व्यत्ययामुळे पहिले सत्र वाया गेल्यानंतर पहिल्या दिवशी नाबाद असलेल्या विकी ओस्तवाल व रामकृष्ण घोष यांनी अर्धशतकी भागीदारी करताना महाराष्ट्राला 239 धावांपर्यंत मजल मारुन दिली. दिवसअखेर केरळच्या संघाची अवस्था 3 बाद 35 अशी झाली होती.
पहिल्या दिवशी आघाडीची फळी पूर्णपणे अपयशी ठरल्यानंतर माजी कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि जलज सक्सेना यांच्या खेळीने महाराष्ट्राच्या संघाला आधार दिला. त्यामुळे पहिल्या दिवशी महाराष्ट्राने 179 धावांपर्यंत मजल मारली होती. दुसऱ्या दिवशी मात्र पावसाने पहिल्या सत्रावर पाणी फेरले. पावसामुळे पहिल्या सत्रातील खेळ पूर्णपणे वाया गेला. उपहारानंतर खेळाला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी नाबाद असलेल्या रामकृष्ण घोष व विकी ओस्तवाल यांनी 79 धावांची खेळी करताना, महाराष्ट्राच्या डावात महत्त्वपूर्ण धावा जोडल्या.
Despite a rain delay, Day 2⃣ turned out to be eventful with Maharashtra fighting back against Kerala. 🤜🤛
WATCH the highlights 🔽 | #RanjiTrophyhttps://t.co/NfK4bFaVeD
— BCCI Domestic (@BCCIdomestic) October 16, 2025
महाराष्ट्राचा पहिला डाव –
अंकित शर्माने अखेर रामकृष्ण घोषला 31 धावांवर बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर रजनीश गुरबानी व विकी ओस्तवालला झटपट बाद करताना केरळच्या गोलंदाजांनी महाराष्ट्राचा डाव गुंडाळला. विकी ओस्तवाच्या 38 धावांच्या जोरावर महाराष्ट्राने पहिल्या डावात 84.1 षटकांत सर्वबाद 239 धावा केल्या. केरळचा वेगवान गोलंदाज एम. डी. निधीश सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 49 धावांच्या मोबदल्यात 5 बळी टिपले. त्याला बेझिलने 3 तर ईडन अॅपल टॉम व अंकित शर्मा यांनी प्रत्येकी एक गडी बाद करताना सुरेख साथ दिली.
हेही वाचा – Ranji Trophy 2025 : पारस डोगराचं रणजीत विक्रमी शतक, वसीम जाफरनंतर ‘हा’ पराक्रम करणारा ठरला दुसराच खेळाडू
केरळचा पहिलाा डाव –
महाराष्ट्राचा पहिला डाव संपल्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या केरळच्या सलामीवीरांना वेगवान गोलंदाजांनी चांगलेच हैराण केले. महाराष्ट्राच्या रजनीश गुरबानीने अक्षय चंद्रन (0) व बाबा अपराजित (6) यांना झटपट बाद करताना चांगली सुरुवात करुन दिली. त्यानंतर जलज सक्सेनाने धोकादायक वाटणाऱ्या रोहन कुन्नम्मलला (38) बाद करत केरळच्या संघाला आनखी एक धक्का दिला. रोहन कुन्नम्मल बाद झाल्यानंतर लगेचच पावसाचे पुनरागमन झाल्याने खेळ थांबवावा लागला. यावेळी केरळने 10.4 षटकांत 3 बाद 35 धावा केल्या होत्या. दुसऱ्या दिवस अखेर सचिन बेबी शुन्यावर खेळत होता.





