Madhya Pradesh : वीर सावरकरांना भारतरत्न मिळालेच पाहिजे; मराठी भाषिक इंदूरमध्ये उतरले रस्त्यावर

इंदूर – बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या 71 व्या अधिवेशनानिमित्त देशभरातून जमलेल्या मराठी भाषिक कुटुंबांनी रविवारी इंदूरमध्ये मिरवणूक काढली. यामध्ये समाजातील लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. वीर सावरकरांना भारतरत्न मिळालेच पाहिजे, अशा घोषणा देत ते सावरकरांचा अपमान सहन करणार नाहीत, अशाही घोषणा देत होते. यानंतर त्यांनी राष्ट्रपतींच्या नावे निवेदन दिले.
वीर सावरकरांच्या 57 व्या पुण्यतिथीनिमित्त इंदूरसह देशभरातील हजारो मराठी भाषिकांनी रविवारी सकाळी मिरवणूक काढून सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी केली. ते म्हणाले की, सावरकरांनी देशासाठी प्राण दिले. त्यांना देशातील सर्वोच्च पुरस्कार भारतरत्नने सन्मानित केले जावे.
पलासिया चौकातील टिळक पुतळ्याजवळ सकाळीच मराठी समाजातील लोक जमू लागले. यामध्ये देशभरातील 300 हून अधिक लोकांचाही सहभाग होता. छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, वीर सावरकर, देवी अहिल्याबाई, माता जिजाऊ यांची वेशभूषा परिधान केलेली मुले मिरवणुकीत घोड्यावर स्वार होती, तर युवक लेझीम नाचत होते. सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी करणारे फलक हातात घेऊन लोक सावरकरांचा अपमान भारत खपवून घेणार नाही, अशा घोषणा देत होते.
हातात भगवे झेंडे आणि गळ्यात भगवे स्कार्फ घेऊन महिला व पुरुष मिरवणुकीत सहभागी झाले होते. जंजीरवाला रोड येथील वीर सावरकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर महापौर पुष्यमित्र भार्गव, सत्यनारायण जातिया, मिलिंद महाजन, प्रशांत बडवे, श्रीराम महाशब्दे, सुनील धर्माधिकारी यांनी उपस्थितांना संबोधित केले. यानंतर वीर सावरकर यांना भारतरत्न देण्यात यावा, अशी मागणी करणारे निवेदन महापौरांना देण्यात आले.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/the-able-bodied-in-the-society-should-accept-the-guidance-of-at-least-2-people-deputy-chief-minister-devendra-fadnavis/
महापौर भार्गव म्हणाले की, सावरकर रत्नाच्या नावाने पुरस्कार जाहीर करून देशाची सेवा करणाऱ्यांना तो पुरस्कार दरवर्षी देण्यात यावा. कीर्तनकार चारुदत्त आफळे, आवाज भंडारे यांनी सावरकरांच्या जीवन कार्याची माहिती दिली.





