Madhya Pradesh : केंद्रीय मंत्री गडकरींच्या हस्ते 6 हजार 800 कोटींच्या कामाचे उद्घाटन

नवी दिल्ली – केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी मुख्यमंत्री शिवराज यांच्या उपस्थितीत मध्य प्रदेशातील ओरछा येथे एकूण 550 किमी लांबीच्या 6,800 कोटी रुपयांच्या 18 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन केले.
यावेळी बोलताना गडकरी म्हणाले की, बेटवावर पूल बांधण्याची स्थानिक नागरीकांची दोन दशके जुनी मागणी पूर्ण झाली आहे. 665 मीटर लांबीचा हा पूल 25 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ओरछा, झाशी आणि टिकमगढची कनेक्टिव्हिटी या कामामुळे सुधारेल.
बेहतर सड़क कनेक्टिविटी से बुंदेलखंड की प्रगति को नई गति देते हुए आज मध्य प्रदेश के ओरछा में 6800 करोड़ रुपये की लागत वाली और 550 किमी कुल लंबाई की 18 राष्ट्रीय राजमार्ग परियोजनाओं का मुख्यमंत्री श्री @ChouhanShivraj जी, केंद्रीय मंत्री श्री @Drvirendrakum13 जी,… pic.twitter.com/IeS0nUvc9s
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) January 23, 2023
भोपाळ-कानपूर इकॉनॉमिक कॉरिडॉरच्या बांधकामामुळे सिमेंट आणि खनिजांची वाहतूक सुलभ होईल आणि लॉजिस्टिक खर्च कमी होईल, असे ते म्हणाले.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/3rd-odi-centurions-shubman-gill-rohit-sharma-star-as-india-complete-3-0-whitewash-over-new-zealand/
बमिठा ते सतना हा 105 किलोमीटर लांबीचा 2000 कोटी रुपये खर्चून 4 लेन ग्रीनफिल्ड रोड बांधण्याची घोषणाही गडकरींनी केली. या रस्त्याच्या निर्मितीमुळे टिकमगड, पन्ना, छतरपूर, खजुराहो आणि बांधवगड राष्ट्रीय उद्यानातील पर्यटनाला चालना मिळणार आहे.





