Mohan Yadav : मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री थोडक्यात बचावले; हेलिकॉप्टरचा हवेत तोल गेला अन्…, नेमकं काय घडलं?
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव (Mohan Yadav ) खंडवा जिल्ह्याच्या दौ-यावर असताना त्यांचे हेलिकॉप्टर हवेत असंतुलित झाल्याची घटना घडली.

Mohan Yadav – महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नुकतेच विमान दुर्घटनेत मुत्यू झाला. ही घटना ताजीच असताना मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव ( Mohan Yadav) खंडवा जिल्ह्याच्या दौ-यावर असताना त्यांचे हेलिकॉप्टर हवेत असंतुलित झाल्याची घटना घडली. सुदैवाने मुख्यमंत्री यादव यांना कोणतीही दुखापत झाली नसून ते थोडक्यात बचावले.
पंधाना येथे राज्यस्तरीय ‘लाडली बहना योजना’ कार्यक्रम आटोपल्यानंतर मुख्यमंत्री भोपाळकडे रवाना होत असताना हेलिकॉप्टर हवेतच काही सेकंदांसाठी असंतुलित झाल्याचे दृश्य दिसून आले. या घटनेमुळे उपस्थितांची काही काळ श्वास रोखला गेला.
उड्डाणानंतर हेलिकॉप्टर पुढे जाण्याऐवजी काही क्षण मागील दिशेने सरकत असल्याचे दिसून आले. त्यामुळे हेलीपॅड परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
हेलिकॉप्टर उड्डाण घेताच हेलीपॅड परिसरात धुळीचे वादळ उडाल्याचे दिसून आले. यावरून पीडब्ल्यूडी विभागाकडून आवश्यक पाणी मारणे व रोलिंग न केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कार्यक्रमाच्या वेळी तीव्र ऊन असल्याने धूळ नियंत्रणासाठी आवश्यक खबरदारी घेतली गेली नसल्याचा आरोप होत आहे.
या धुळीमुळे काही क्षण हेलिकॉप्टर असंतुलित झाले, ज्याला मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेतील त्रुटी म्हणूनही पाहिले जात आहे. अशा परिस्थितीत पायलटने प्रसंगावधान आणि कौशल्य दाखवत तत्काळ परिस्थिती नियंत्रणात आणली. काही क्षणांतच हेलिकॉप्टरने धुळीतून सुरक्षित उंची गाठली. त्यानंतर मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांचा खंडव्यातून भोपाळपर्यंतचा प्रवास पूर्णत: सुरक्षित पार पडला.
ही बातमी वाचा…






