‘भूल भुलैया 3’ नंतर माधुरी दीक्षित आणि तृप्ती डिमरी पुन्हा दिसणार एकत्र

Madhuri Dixit and Trupti Dimri | अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि तृप्ती डिमरी यांनी अनीस बज्मी यांच्या ‘भूल भुलैया 3’ चित्रपटात एकत्र काम केले होते. आता तृप्ती आणि माधुरी पुन्हा एकदा एकत्र पाहायला मिळणार आहेत. सुरेश त्रिवेणी यांच्या दिग्दर्शनाखालील एका कॉमेडी ड्रामामध्ये दोघी एकत्र काम करण्यासाठी सज्ज होणार आहेत.
पिपिंग मूनच्या रिपोर्ट्सनुसार, माधुरी दीक्षित आणि तृप्ती डिमरी विक्रम मल्होत्राच्या प्रॉडक्शन बॅनर अबुंडंशिया एंटरटेनमेंटसाठी एका कॉमेडी ड्रामामध्ये स्क्रीन शेअर करणार आहेत, ज्याचे नाव सध्या ‘माँ बेहन’ असल्याचे म्हटले जात आहे. तसेच तो नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. पुढील महिन्यात मुंबईत त्याचे शूटिंग सुरू होणार असल्याचे देखील म्हंटले जात आहे.
हा चित्रपट एक कॉमेडी-ड्रामा आहे, जो तीन पात्रांवर आधारित आहे, ज्यामध्ये माधुरी दीक्षित आणि तृप्ती डिमरी या कथेत आई-मुलगी म्हणून दिसणार आहेत. कलाकारांमध्ये रवि किशन आणि धारणा दुर्गा यांचाही समावेश आहे. तर या चित्रपटासाठी मुख्य अभिनेत्याचा शोध अजूनही सुरू आहे.
तृप्ती डिमरीबद्दल बोलायचे झाले तर, ती विशाल भारद्वाज यांच्या आगामी चित्रपट ‘अर्जुन उस्तरा’मध्ये शाहिद कपूरसोबत दिसणार आहे. मात्र, ती ‘आशिकी 3’ मधून बाहेर पडली आहे, परंतु तिला सतत मोठ्या चित्रपटांच्या ऑफर मिळत आहेत.
हेही वाचा :





