मनं हेलावून टाकणारे दृश्य ! लग्नाच्या सात दिवसांनंतरच पहलगाम दहशतवादी हल्ल्यात नौदलाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू

Pahalgam Terrorist Attack | जम्मू काश्मीरमधील लोकप्रिय पर्यटन स्थळ असलेल्य पहलगाम येथे मंगळवारी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यामध्ये २७ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. पहलगाममधील बेसरन परिसरात हजारोंच्या संख्येने असलेल्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. पोलिसांच्या वेशात आलेल्या दहशतवाद्यांनी नाव आणि धर्म विचारत पर्यटकांची हत्या करण्यास सुरुवात केली.
या हल्ल्यानंतर मन हेलावून टाकणारा सर्वाधिक व्हायरल झालेला फोटो भारतीय नौदलातील अधिकारी लेफ्टनंट विनय नरवाल आणि त्यांची पत्नी हिमानी यांचा आहे. या हल्ल्यात भारतीय नौदलातील अधिकारी लेफ्टनंट विनय नरवाल यांचाही मृत्यू झाला. विजय नरवाल २६ वर्षांचे होते आणि ते कोची येथे तैनात होते. मात्र रजेवर असताना पहलगाम हल्ल्यात विनय नरवाल शहीद झाले आहेत.
लग्नाच्या अवघ्या सात दिवसांनंतर मृत्यू
ते मूळचे हरियाणाचे रहिवासी होते आणि १६ एप्रिल रोजी त्यांचे लग्न झाले होते. लग्नाच्या सात दिवसानंतरच विनय नरवाल यांची पहलगाममध्ये हत्या करण्यात आली आहे. लग्नानंतर हनिमूनसाठी विनय नरवाल हे पहलगाममध्ये फिरण्यासाठी गेले होते. मात्र दहशतवाद्यांनी त्यांची गोळी झाडून हत्या केली. विनय नरवाल यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीला जबर धक्का बसला आहे.
दरम्यान, पहलगाममधील या घटनेनंतर विनय यांच्या पत्नीचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये त्या सांगतात की त्यांचे पती भेलपुरी खात होते. यावेळी दहशतवाद्यांनी त्यांना मुस्लिम नसल्याचे समजून गोळी मारली.
One Indian Navy Officer, Lieutenant Vinay Narwal (aged 26 years), who was posted in Kochi, has been killed in the Pahalgam attack while he was on leave. He is a native of Haryana and got married on 16 April: Defence Officials
— ANI (@ANI) April 22, 2025
माहितीनुसार, विनय दोन वर्षांपूर्वी भारतीय नौदलात भरती झाले होते. 16 एप्रिलला रिसेप्शननंतर ते 21 एप्रिलला हनीमूनसाठी काश्मीरला गेले होते. दहशतवाद्यांनी विनय यांच्या छातीवर, गळ्यावर आणि डाव्या हातावर गोळ्या झाडल्या होत्या, ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर त्यांच्या घरी शांतता पसरली असून कुटुंबातील काही सदस्य श्रीनगरला रवाना झाले आहेत. Pahalgam Terrorist Attack |
पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात परतले
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर रवाना झाले होते. मात्र या हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींना दौरा अर्धवट सोडून ते बुधवारी दिल्लीत पोहोचले. पंतप्रधान मोदी दिल्ली विमानतळावर पोहोचल्यानंतर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि अजित डोभाल यांनी या हल्ल्याबाबत त्यांना माहिती दिली. Pahalgam Terrorist Attack |
हेही वाचा :





