जुन्नरच्या पूर्वभागात यंत्राद्वारे ‘पेरणी’
Updated On:

बेल्हे (वार्ताहर) – जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात खरीप हंगामाची पेरणी आधुनिक यंत्राच्या सहाय्याने सुरू आहे.
राजुरी, बोरी, साळवाडी, जाधववाडी, शिरोली, सुलतानपूर, वडगाव कांदळी, भोरवाडी या गावांमध्ये पेरणी होईल, असा पाऊस झाला आहे. या भागातील शेतकऱ्यांनी बाजरी, सोयाबीन, उडीद, मूग, मठ आदी पिकांची पेरणी सुरू केलेली दिसून येत आहे.
सध्या बैलांची संख्या घटल्याने व बैल हाकणारे, त्याद्वारे पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी असल्याने जवळपास बहुतेक शेतकरी ट्रॅक्टरने पेरणी करताना दिसून येत आहेत.





