Yuzvendra Chahal Post : ‘आईची, शपथ खा की, तू…’, पोटगीच्या चर्चेवरुन युझीचा धनश्रीवर अप्रत्यक्ष निशाणा

Yuzvendra Chahal Post Viral : भारतीय क्रिकेटपटू युझवेंद्र चहल पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. त्याने इन्स्टा स्टोरीवर शेअर केलेली एक पोस्ट सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये त्याने दिल्ली हायकोर्टाच्या पोटगीबाबतच्या निकालाचा स्क्रिनशॉट शेअर करत आपली एक्स वाईफ धनश्री वर्मावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे त्याने शेअर केली पोस्ट नक्की काय आहे? जाणून घेऊया.
युझवेंद्र चहलची पोस्ट व्हायरल –
युझवेंद्र चहलने शेअर केलेल्या कोर्टाच्या निकालात म्हटले आहे की, “आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असलेली पत्नी पतीकडून पोटगी मागू शकत नाही.” या पोस्टसोबत त्याने लिहिले, “आईची, शपथ खा की, तू या निर्णयावरुन पलटणार नाहीस.” ही पोस्ट काही वेळातच प्रचंड व्हायरल झाली, परंतु चहलने ती लगेच डिलीट केली. तरीही ती सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.
View this post on Instagram
चहलच्या या पोस्टमुळे सोशल मीडियावर नेटकऱ्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. काहींनी त्याच्या पोस्टला पाठिंबा दिला, तर काहींनी त्याच्यावर टीका केली आहे. ही पोस्ट डिलीट झाली असली, तरी ती अजूनही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हेही वाचा – Asia Cup Trophy : मोहसीन नक्वींची आणखी एक लाजिरवाणी कृती, ACC मुख्यालयातून आशिया कप ट्रॉफी केली गायब
चहल-धनश्री घटस्फोट आणि पोटगीचा वाद –
युझवेंद्र चहल आणि कोरिओग्राफर तसेच इन्फ्लुएन्सर धनश्री वर्मा यांचा घटस्फोट डिसेंबर 2020 मध्ये झाला होता. मुंबई उच्च न्यायालयात मार्च 2025 मध्ये त्यांचे मार्ग वेगळे झाले. या जोडप्याने क्रिकेट विश्वातील सर्वाधिक लोकप्रिय जोडप्यांपैकी एक म्हणून ओळख मिळवली होती. घटस्फोटानंतर चहलने धनश्रीला 4 कोटी रुपयांची पोटगी दिल्याची माहिती समोर आली आहे.
दोघेही नव्या आयुष्यात व्यस्त –
घटस्फोटानंतर चहल आणि धनश्री आपापल्या आयुष्यात पुढे गेले आहेत. धनश्री नुकतीच ‘राईज अँड फॉल’ या रिअॅलिटी शोमध्ये दिसली, जिथे तिने तिच्या घटस्फोटाबद्दल उघडपणे चर्चा केली. दुसरीकडे, युझवेंद्र चहल आणि आरजे महवश यांच्या नात्याच्या चर्चांना उधाण आले आहे. दोघेही अनेकदा एकत्र दिसल्याने या अफवांना आणखी बळ मिळाले आहे.





