Vaibhav Suryavanshi : पाटण्यात मोदी-वैभव भेट; चमकत्या ताऱ्याला पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा! पाहा VIDEO

Vaibhav Suryavanshi Meets PM Modi Video Viral : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, शुक्रवार, ३० मे रोजी बिहार दौऱ्यावर असताना, त्यांची पाटणा विमानतळावर आयपीएल स्टार वैभव सूर्यवंशी सोबत भेट झाली. यावेळी १४ वर्षीय वैभवसह त्यांचे कुटुंबही उपस्थित होते. यानंतर मोदी यांनी वैभवशी झालेल्या भेटीची माहिती त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटद्वारे दिली. यावेळी मोदींनी वैभवला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधानांनी वैभव आणि त्याच्या परिवारासोबतच्या या भेटीचे काही फोटो एक्सवर शेअर केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे फोटो शेअर करताना लिहिले, ‘पटना विमानतळावर युवा क्रिकेट स्टार वैभव सूर्यवंशी आणि त्याच्या परिवाराशी भेट झाली. त्याच्या क्रिकेट कौशल्याचे संपूर्ण देशात कौतुक होत आहे! त्याच्या भविष्यातील प्रयत्नांसाठी माझ्या शुभेच्छा.’
At Patna airport, met the young cricketing sensation Vaibhav Suryavanshi and his family. His cricketing skills are being admired all over the nation! My best wishes to him for his future endeavours. pic.twitter.com/pvUrbzdyU6
— Narendra Modi (@narendramodi) May 30, 2025
#WATCH | At Patna airport, PM Narendra Modi met the young cricketing sensation Vaibhav Suryavanshi and his family.
“His cricketing skills are being admired all over the nation! My best wishes to him for his future endeavours,” tweeted PM Modi pic.twitter.com/DAmYuD8Y2t
— ANI (@ANI) May 30, 2025
पंतप्रधान मोदी आणि वैभव सूर्यवंशी यांच्या भेटीचा एक व्हिडिओही समोर आला आहे. व्हिडिओमध्ये वैभव मोदींचे पायांना स्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घेत असल्याचे दिसत आहे. राजस्थान रॉयल्स संघाने आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात वैभव सूर्यवंशीला १ कोटी १० लाख रुपयांना खरेदी करत संघात स्थान दिले. आयपीएल २०२५ च्या लीग टप्प्यात १९ एप्रिल रोजी राजस्थान आणि लखनौ यांच्यातील सामन्यात वैभवने पदार्पण केले तेव्हा तो आयपीएलमध्ये खेळणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला.
हेही वाचा – PBKS vs RCB : ‘यह तो पानी पिलाता है…’, विराटकडून युवा पदार्पणवीर मुशीर खानला स्लेजिंग, VIDEO व्हायरल
याशिवाय, गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात केवळ ३५ चेंडूत शतक ठोकून वैभव आयपीएलच्या इतिहासात सर्वात कमी चेंडूत शतक झळकावणारा भारतीय खेळाडू ठरला. वैभवला एकूण ७ सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली ज्यामध्ये त्याने ३६ च्या सरासरीने एकूण २५२ धावा केल्या. या दरम्यान, वैभवचा स्ट्राईक रेट २०६.५६ होता, तर त्याच्या बॅटमधून एक शतक आणि एक अर्धशतकी खेळी देखील दिसून आली.





