सिनेकलाकारांच्या भोवती नेहमीच प्रसिद्धीचं वलय असल्याचं पाहायला मिळतं. पडद्यावर दिसणारे कलाकार रिअल-लाईफमध्ये कसे असतील? त्यांच्या आवडी-निवडी काय असतील? अशा अनेक बाबींबाबत सामान्यांना कुतूहल असतंच. नुकताच दाक्षिणात्य सुपरस्टार असलेल्या अल्लू अर्जुन व नॅशनल क्रश रश्मीका मंदाना यांची प्रमुख भूमिका असलेला ‘पुष्पा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. २०२०मध्ये गुगलबाबाने रश्मीका मंदाना नॅशनल क्रश असल्याचं जाहीर केलं होत. अशातच आता पुष्पाला मिळत असलेल्या यशामुळे रश्मीका पुन्हा एकदा गुगल सर्चमध्ये ट्रेंड करत आहे. यावेळी नेटकरी रश्मीका मंदाना एका चित्रपटासाठी किती चार्ज करते? तिची एकूण संपत्ती किती आहे? याचा शोध घेत असल्याचं समोर आलंय.
रश्मीका रश्मिका हे नाव कलाक्षेत्रात रुची असलेल्यांसाठी सर्वपरिचत आहे. तिचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. त्यामुळेच रश्मीका टॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे.२०१६ मध्ये कलाविश्वात सक्रीय झालेल्या रश्मिकाने किरिक पार्टी या कन्नड चित्रपटातून कलाविश्वात पदार्पण केलं. त्यानंतर तिचे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले. रश्मीका एका चित्रपटासाठी ३ ते ४ कोटी रुपये मानधन घेते. त्यामुळे तिचं नेटवर्थ $400 मिलिअन असल्याचं सांगण्यात येतं.
रश्मीकाला लक्झरी गाड्यांची आवड असून तिच्याकडे ५० लाखांची मर्सिडीज बेंझ सी क्लास आहे. तसंच, ऑडी क्यू-३, टोयोटा इनोवा आणि ह्युंदाय क्रेट या गाड्यादेखील तिच्याकडे आहेत. रश्मीकाचा बंगळुरुमध्ये आलिशान बंगला असून त्याची किंमत ८ कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येतं. लक्झरी लाईफस्टाईल पसंत असलेल्या रश्मीकाला बॅग्सची विशेष आवड असून तिच्याकडे असलेल्या प्रत्येक बॅगची किंमत ३ लाख आणि त्यापेक्षा जास्त आहे.