थिएटरमध्ये रिलीज होण्याअगोदरच सिकंदर तब्बल ‘इतक्या’ साइट्सवरुन लीक: कोमल नहाटा यांचे ट्वीट

Sikander movie leaked | बालीवडूचा अभिनेता सलमान खानचा बहुप्रतिक्षित ‘सिकंदर’ हा चित्रपट आज ३० मार्च रोजी चित्रपटगृहात रिलीज झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चाहते या चित्रपटाच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर सिंकदर चित्रपट चाहत्यांच्या भेटीला आला आहे. मात्र, हा चित्रपट रिलीज होण्याच्या काही तास अगोदर अनेक साइट्सवर लीक झाला असल्याचे चित्रपट अभ्यासक कोमल नहाटा यांनी सांगितले आहे. यामुळे आता सिंकरदच्या रिलीजपेक्षा चित्रपट लीक झाल्याचीच चर्चा केली जात आहे.
हा चित्रपट जवळपास तब्बल 600 साइट्सवर लीक झाला होता, ज्यामुळे निर्मात्यांची झोप उडाली आहे. यावर ट्रेड ॲनालिस्ट कोमल नाहटा यांनी सांगितले, हे कृत्य कोणत्याही निर्मात्यासाठी दुःस्वप्न आहे. त्यांनी काल संध्याकाळी साजिद नाडियाडवाल यांना सांगितले की, ‘सिकंदर’ चित्रपट लीक झाला होता, तो 600 साईट्सवरून हटवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, पण तोपर्यंत नुकसान झाले होते. तसेच कोमल नहाटा यांनी याचा निषेध केला आहे. ही गोष्ट चित्रपटाच्या निर्मात्यांना महागात पडू शकते असेही ते म्हणाले आहेत. ट्रेड ॲनालिस्ट कोमल नाहाटा यांनी ‘सिकंदर’ ऑनलाइन लीक झाल्याबद्दल ट्वीट करत माहिती दिली.
It’s the worst nightmare for any producer. A film being leaked before its theatrical release. Unfortunately, that’s what happened last evening to Sajid Nadiadwala’s ‘Sikandar’, slated to release today in cinemas. The producer had the authorities pull the film down from 600 sites… pic.twitter.com/mRA8T4qG23
— Komal Nahta (@KomalNahta) March 30, 2025
सिंकदरला ५० कोटींची ओपनिंग?
अखेर चाहत्यांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर सलमान खानचा ‘सिकंदर’ हा चित्रपट आज ३० मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. यावर चाहत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत, अनेक चाहते याला पैसा वसुल आणि सलमान खानचा परिपूर्ण चित्रपट म्हणत आहेत. दुसरीकडे, भाईजानच्या अभिनयाचे चाहत्यांकडून कौतुक करण्यात येत आहे. चित्रपटाच्या क्लायमॅक्सची प्रेक्षक प्रशंसा करत आहेत. सिंकदर चित्रपट ओपनिंग डेला ५० कोटींची कमाई करू शकतो, असे चित्रपट विश्लेषकांकडून सांगण्यात येत आहे.





