टीम इंडिया ४९ धावांत ५ बाद, आफ्रिकेच्या ‘या’ गोलंदाजाने घेतल्या ४ विकेट

IND vs SA – भारतीय संघ आणि साऊथ आफ्रिका यांच्यात पर्थ येथील मैदानावर सामना खेळला जात आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने सामान्यांच्या सुरुवातीला नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आफ्रिकेच्या गोलंदाजांनी रोहितचा हा निर्णय चुकीचा ठरवला. आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजीच्या माऱ्यासमोर भारतीय संघाची फलंदाजी कागदांच्या पत्त्यांसारखी कोसळली आहे. रोहित शर्मा ( १५ धावा ), केएल राहुल ( ९ धावा ), विराट कोहली ( १२ धावा ), दीपक हुडा ( ० धावा ) आणि हार्दिक पंड्या ( २ धावा ) यांना एकानंतर एक बाद केले.
कतरिना कैफ दिसली क्रिकेट खेळताना, चाहते म्हणाले…
सध्या भारतीय संघाकडून सूर्यकुमार यादव ( २७ धावा नाबाद ) आणि दिनेश ( २ धावा नाबाद ) कार्तिक खेळपट्टीवर आहेत. आता भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या नजरा या दोघांच्या फलंदाजीवर आहेत. कारण यानंतर आता कोणताही फलंदाज राहिलेला नाही. भारतीय संघ बातमी लिहिली त्या वेळेपर्यंत 75 धावांवर ५ बाद अशा स्थितीत आहे. अफ्रकेकडून गोलंदाजीत लुंगी एनगिडीने ४ फलंदाजांना तंबूत पाठवले. तर अॅनरिक नॉरखिया याने १ गडी बाद केला आहे.
India lose their fourth as South Africa gain control in Perth 👀#INDvSA | #T20WorldCup | 📝: https://t.co/GI5MZQJSjA pic.twitter.com/GkOdxshU2g
— ICC (@ICC) October 30, 2022
सामन्यातील दोन्ही संघांच्या प्लेइंग इलेव्हन
भारतीय संघ – रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, दीपक हुडा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार आणि अर्शदीप सिंग.
साऊथ आफ्रिका संघ – टेंबा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), रिले रुसो, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, वेन पारनेल, केशव महाराज, लुंगी एनगिडी, कगिसो रबाडा, अॅनरिक नॉरकीय.





