टी-२० विश्वचषक २०२२ मध्ये भारताची कामगिरी आतापर्यंत चांगली राहिली आहे. स्पर्धेतील भारताचा तिसरा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. हा सामना भारतासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. कारण जर टीम इंडियाआज दक्षिण आफ्रिकेला पराभूत करण्यात यशस्वी ठरली तर भारतासाठी उपांत्य फेरी जवळजवळ निश्चित होईल. आजचा सामना पार्थ येथील मैदानावर खेळला जात असल्याने तेथील खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना मदत करते.
#T20WorldCup2022 | टीम इंडियानं जिंकला टॉस, कॅप्टन रोहितने घेतला ‘हा’ निर्णय
पार्थ येथील खेळपट्टी आणि आफ्रिकेची गोलंदाजी पाहता भारताने एक फलंदाज जास्त खेळवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अक्षर पटेलच्या जागी दीपक हुडाला संघात स्थान देण्यात आले आहे. या रोमांचक सामन्यापूर्वी अभिनेत्री कतरिना कैफ स्टार स्पोर्ट्सच्या एका कार्यक्रमात हजर होती. अभिनेत्री कतरिना कैफ, सिद्धांत कपूरचा बहुप्रतिक्षित ‘फोनबूथ’ हा चित्रपट ४ नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे.
या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आणि टीम इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी या चित्रपटाची स्टारकास्ट स्टार स्पोर्ट्सच्या कार्यक्रमाला पोहोचली होती. विशेष म्हणजे या कार्यक्रमात अभिनेत्री कतरिना कैफ बॅटिंग करताना दिसली. व्हिडिओमध्ये भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग गोलंदाजी करत असून कतरिना फलंदाजी करत असल्याचे पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. नेटकरीही यावर मजेदार प्रतिक्रिया देत आहेत.
टी-२० विश्वचषकातील २९ वा सामना भारत आणि साऊथ आफ्रिका यांच्यात पार्थ येथील क्रिकेट मैदानावर खेळला जाणार आहे. सामान्यांच्या सुरुवातीला भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर फलंदाजीच्या दृष्टीने भारतीय संघात काही बदलही करण्यात आले आहेत. भारतीय संघाच्या तुलनेत आफ्रिकेची वेगवान गोलंदाजी थोडी वरचढ वाटत आहे.
View this post on Instagram