LSG vs MI : ‘हा स्वत:लाच लॉर्ड म्हणतोय…’, रोहितने चिडवताचं शार्दुल म्हणाला, ‘मग तूच तर नाव…’,पाहा VIDEO

LSG vs MI Rohit Sharma and Shardul Thakur funny video viral : आयपीएल २०२५ चा १६ वा सामना लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात शुक्रवारी खेळला जाणार. या सामन्यापूर्वी, रोहित शर्मा आणि शार्दुल ठाकूर यांच्या मजेदार शैलीचा व्हायरल झाला आहे. मुंबई आणि लखनौ यांच्यातील सामना ४ एप्रिल रोजी लखनौच्या एकाना स्टेडियमवर खेळला जाईल. या सामन्यापूर्वी दोन्ही संघांच्या खेळाडूंनी मजा केली. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
रोहित-शार्दुलचा व्हिडीओ होतोय व्हायरल –
रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचा माजी खेळाडू झहीर खानला पाहतो आणि त्याच्याकडे जातो. झहीर खान सध्या लखनौ सुपर जायंट्सशी मार्गदर्शक म्हणून संबंधित आहे. पण त्याचदरम्यान शार्दुल ठाकूर रोहित शर्मासोबत विनोद करताना दिसतो. त्यानंतर रोहित शर्मा झहीर खानला भेटतो.
Lovely to meet 𝙏𝙝𝙚 𝙇𝙤𝙧𝙙 & 𝙈𝙧. 𝙆𝙝𝙖𝙣 😂💙#MumbaiIndians #PlayLikeMumbai #TATAIPL #LSGvMI [Rohit Sharma] pic.twitter.com/pTDdh0Uwh1
— Mumbai Indians (@mipaltan) April 3, 2025
जेव्हा ठाकूरने रोहित शर्माला पाहिले तेव्हा तो गंमतीने म्हणाला की, ‘रोहित शर्मा मैदानावर फक्त एकाच व्यक्तीला भेटायला येतो, तो म्हणजे लॉर्ड ठाकूर.’ यानंतर रोहित शर्मा हसून म्हणतो की, हा स्वतःलाच लॉर्ड म्हणत आहे. यावर शार्दुल म्हणतो, ‘आणखी काय, तूच ते नाव ठेवलं आहेस.’ त्यानंतर हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे.
शार्दुल ठाकूरला कशी मिळाली संधी –
दुखापतीमुळे संपूर्ण हंगामाबाहेर असलेल्या मोहसीन खानच्या जागी ठाकूरला एलएसजी संघात शेवटच्या क्षणी स्थान देण्यात आले. या हंगामात सामील झाल्यानंतर, शार्दुल ठाकूरने उत्कृष्ट गोलंदाजी केली आहे आणि तो चांगल्या लयीत दिसत आहे. शार्दुलने आतापर्यंत ३ सामन्यात एकूण ६ विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान, शार्दुलने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध ४ विकेट घेत संघाला पहिला विजय मिळवून दिला.
हेही वाचा – KKR vs SRH : कोलकाताने हैदराबादचा उडवला धुव्वा! अय्यर-अरोरा ठरले विजयाचे शिल्पकार
रोहित शर्माला फॉर्ममध्ये परतावे लागेल –
रोहित शर्माला या हंगामात फलंदाजीत चांगली कामगिरी करण्यात अपयश आले आहे. एमआयसाठी सलामीला येत असताना, त्याने आतापर्यंत खेळलेल्या तीन सामन्यांमध्ये फक्त २१ धावा केल्या आहेत. पाच वेळा विजेत्या संघाला आशा असेल की रोहित त्यांच्या फ्रँचायझीसाठी चांगली सुरुवात करुन देईल. गेल्या हंगामातील त्यांच्या सर्वात वाईट कामगिरीनंतर जेतेपदाच्या शर्यतीत पुन्हा परतण्याचा प्रयत्न असेल.





