LSG vs MI Mitchell Marsh break Shikhar Dhawan record in IPL 2025 : आयपीएल २०२५ मधील १६वा सामना मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करायला आलेल्या लखनौ मिचेल मार्शच्या वादळी खेळीच्या जोरावर ८ बाद २०३ धावा केल्या. दरम्यान या सामन्यात मिचेल मार्शने धावांची वादळी खेळी साकारताना १० वर्षांपूर्वींचा जुना विक्रम मोडला आहे. जो शिखर धवनच्या नावावर होता. आता आयपीएलच्या पॉवर प्लेमध्ये हा खास पराक्रम करणारा मिचेल मार्श पहिला खेळाडू ठरला आहे. मिचेल मार्शने पॉवर प्लेमध्ये केला नवा विक्रम – नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करायला आलेल्या लखनौ संघासाठी एडन मार्करम आणि मिचेल मार्शने सलामी दिली. मार्करमने सावध सुरुवात केली, पण मिचेल मार्शने येताच आक्रमक शैलीत फलंदाजी करायला सुरुवात केली. एकवेळ परिस्थिती अशी होती की मार्करमला फलंदाजीची संधी मिळत नव्हती. मिचेल मार्श बहुतेक चेंडू खेळत होता. जेव्हा पॉवरप्ले म्हणजेच पहिले सहा षटके संपली तेव्हा, असे दिसून आले की ३६ चेंडूंपैकी फक्त ६ चेंडू मार्करमने खेळले आणि उर्वरित ३० चेंडू मिशेल मार्शने खेळले होते. यादरम्यान त्याने शिखर धवनचा विक्रम मोडला. मिचेल मार्शने मोडला शिखर धवनचा विक्रम – पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक चेंडू खेळण्याचा विक्रम याआधी शिखर धवनच्या नावावर होता. ज्याने १० वर्षांपूर्वी म्हणजे २०१५ मध्ये शिखर धवनने पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक चेंडूचा सामना केला होता. त्यावेळी धवने सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना मुंबई इंडियन्सविरुद्ध हा पराक्रम केला होता. शिखर धवनने वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात शिखर धवनने पॉवरप्लेमध्ये २९ चेंडू खेळले होते. म्हणजेच मिचेल मार्शपेक्षा कमी चेंडू कमी खेळला होता. त्यावेळी शिखर धवनने २०१० मध्ये पॉवर प्लेमध्ये २८ चेंडू खेळणाऱ्या सौरव गांगुलीचा विक्रम मोडला होता. हेही वाचा – LSG vs MI : रोहित शर्माला लखनौविरुद्धच्या सामन्यातून का वगळले? कर्णधार हार्दिक पंड्याने सांगितले ‘हे’ कारण हार्दिक पंड्याने घेतल्या पाच विकेट्स – सामन्याबद्दल बोलायचे, तर लखनौ सुपर जायंट्सने २० षटकांत ८ गडी गमावून २०३ धावा केल्या. २० व्या षटकात हार्दिक पंड्याने १५ धावा दिल्या आणि दोन विकेट्स घेतल्या. अशाप्रकारे हार्दिकने ४ षटकांत ३६ धावा देत ५ विकेट्स घेतल्या. लखनौकडून मिचेल मार्शने ६०, एडन मार्करमने ५३, आयुष बदोनीने ३० आणि डेव्हिड मिलरने २७ धावा केल्या. कर्णधार ऋषभ पंत पुन्हा एकदा अपयशी ठरला. तो फक्त २ धावा करू शकला.