LSG vs MI : लखनौच्या ऋषभ आणि दिग्वेशला BCCI चा दणका! ‘या’ कृतीसाठी केली दंडात्मक कारवाई, जाणून घ्या कारण

LSG vs MI BCCI fine to Digvesh Rathi and Rishabh Pant : आयपीएल २०२५ मधील १६व्या सामन्यात लखनौने मुंबईचा १२ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना लखनौने ८ गडी गमावून मुंबईसमोर २०४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र, प्रत्युत्तरात मुंबईला ५ गडी गमावून निर्धारित षटकांत १९६ धावाच करता आल्या. दरम्यान या सामन्यात केलेल्या चुकांसाठी दोन खेळाडूंना बीसीसीआयने दंड ठोठावला आहे, ज्यामध्ये एलएसजीचा कर्णधार ऋषभ पंत आणि दिग्वेश राठी यांचा समावेश आहे. या सामन्यात दोघांकडून कोणती चूक झाली जाणून घेऊया.
लखनौ सुपर जायंट्सचा फिरकी गोलंदाज दिग्वेश राठी शनिवारी पुन्हा एकदा चर्चेत आला. कारण त्याला त्याच्या वादग्रस्त सेलिब्रेशनबद्दल त्याच्या मॅच फीच्या ५० टक्के दंड ठोठावण्यात आला. मागील सामन्यात अशाच प्रकारे नोटबुक सेलिब्रेशन केल्याबद्दल दिग्वेशला त्याच्या सामन्याच्या मॅच फीच्या २५% दंड आणि एक डिमेरिट पॉइंट देण्यात आला होता. मात्र, त्या शिक्षेनंतरही, तो सुधारला नाही आणि त्याने पुन्हा त्याचप्रकारे वादग्रस्त सेलिब्रेशनबद्दल केले.
PBKS match – 25% of match fees & 1 Demerit Point.
MI match – 50% of match fees & 2 Demerit Points.
Lucknow got Digvesh Rathi for 30 Lakhs in the auction 📢 pic.twitter.com/RRkBsKz2WA
— Johns. (@CricCrazyJohns) April 5, 2025
नमन धीरला बाद केल्यानंतर दिग्वेशने केले नोटबुक सेलिब्रेशन –
मुंबईविरुद्धच्या सामन्यात, नमन धीरला बाद केल्यानंतर दिग्वेशने पुन्हा एकदा नोटबुक सेलिब्रेशन केले. त्याच्याबद्दल बीसीसीआयने म्हटले की, ‘या हंगामात कलम २.५ अंतर्गत हा त्याचा दुसरा लेव्हल १ गुन्हा होता आणि त्याला दोन डिमेरिट पॉइंट्स देण्यात आले आहेत.’ यापूर्वी, पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यादरम्यान वादग्रस्त सेलिब्रेशन केल्याबद्दल त्याला एक डिमेरिट पॉइंट मिळाला होता.
आचारसंहितेच्या लेव्हल १ च्या उल्लंघनासाठी, सामनाधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक असतो. पंजाबविरुद्धच्या सामन्यात, प्रियांश आर्यला बाद केल्यानंतर दिग्वेशने नोटबुक सेलिब्रेशन केले. त्याच्या या कृतीवर अनेक माजी खेळाडूंनीही नाराजी व्यक्त केली होती. मुंबईविरुद्ध त्याने चार षटकांत फक्त २१ धावा देऊन एक विकेट्स घेतली. या शानदार कामगिरीसाठी त्याला सामनावीर म्हणूनही निवडण्यात आले.
आयपीएलने ऋषभ पंतबाबत जारी केली एक प्रेस रिलीज –
आयपीएलने जारी केलेल्या प्रेस रिलीजमध्ये असे सांगण्यात आले आहे की, लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंतला शुक्रवारी लखनौच्या एकाना क्रिकेट स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्धच्या आयपीएल २०२५ च्या १६ व्या सामन्यात स्लो ओव्हर रेट राखल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीएल आचारसंहितेच्या कलम २.२२ अंतर्गत, जो किमान ओव्हर-रेट गुन्ह्यांशी संबंधित आहे, या हंगामातील त्याच्या संघाचा हा पहिलाच गुन्हा असल्याने, ऋषभ पंतला १२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.





