LPG Rules : LPG च्या नियमात होणार ‘हे’ 5 महत्त्वाचे बदल; 1 जून पासून होणार लागू
आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, भारतात १ जूनपासून एलपीजी (LPG Rules) गॅस सिलिंडरच्या नियमांमध्ये अत्यंत महत्त्वाचे आणि कडक बदल करण्यात येत आहेत.

LPG Rules : इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावामुळे जागतिक स्तरावर इंधनाचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. या आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, भारतात १ जूनपासून एलपीजी (LPG Rules) गॅस सिलिंडरच्या नियमांमध्ये अत्यंत महत्त्वाचे आणि कडक बदल करण्यात येत आहेत.
अनेक कुटुंबांनी एलपीजी (LPG Rules) सिलिंडरऐवजी पीएनजी कनेक्शन घेतले आहेत. सरकारच्या निर्देशानुसार, पीएनजी आणि एलपीजी याचे दोन्ही कनेक्शन असतील, त्यांना एलपीजी सिलिंडर पुन्हा एजन्सीला द्यावे लागतील.
त्यांना केवळ पीएनजी कनेक्शनचा वापर करावा लागेल, परंतु काही जण एलपीजी सिलिंडर (LPG Rules) पुन्हा एजन्सीला देण्यास टाळाटाळ करत आहेत. मागील दशकात एलपीजी वापरणाऱ्यांची संख्या ३३.५ कोटी इतकी झाली आहे. तर पीएनजी युजर्सची संख्या १.६४ कोटी झाली आहे.
घरगुती सिलिंडरचा गैरवापर आणि काळाबाजार रोखण्यासाठी सरकारने आता ‘एक कुटुंब, एक कनेक्शन’ हे धोरण अधिक प्रभावीपणे राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार खालील नियमांमध्ये बदल करण्यात आले आहे.
एक कुटुंब, एक कनेक्शन
भारतात ज्या कुटुंबाकडे पीएनजी कनेक्शन आहेत. त्यांना एलपीजी सिलिंडर पुन्हा संबंधित एजन्सीला द्यावे लागतील. तेल वितरण करणारी कंपनी घरगुती सिलिंडर गैरवापर, काळाबाजार रोखण्यासाठी पीएनजी आणि एलपीजी या दोन्हीचा वापर करणाऱ्यांची नोंद करणे सुरू केलं आहे. आता दोन्हीपैकी एकाचा वापर करण्यास शासनाने आवाहन केलं आहे.
एलपीजी कनेक्शन ट्रान्सफर
पीएनजी कनेक्शन मिळाल्यानंतर ३० दिवसांत एलपीजी कनेक्शन बंद करण्यास सांगितलं आहे. तसेच ज्या भागात पीएनजी कनेक्शन नाही, त्या भागात पुन्हा एलपीजी सिलिंडर वापरता येईल.
जून महिन्यापासून सिलिंडर मिळणे होईल मुश्किल
जून महिन्यापासून पीएनजी पाइपलाइन असलेल्या क्षेत्रात एलपीजी सिलिंडर बुक करणे किंवा रिफिल करण्यास रोखलं जाणार आहे. शहरात गॅस वितरण कंपन्या आणि तेल विपणन कंपन्यांनी डिजिटल डेटाबेस पूर्णपणे एकीकृत केलं जाणार आहे. पीएनजी कनेक्शन मुदतवाढीची अंतिम मुदत ३० जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे.
गॅस सिलिंडर बुकिंग करण्यासाठी डेडलाइन
शहरात एलपीजी सिलिंडर बुकिंग करण्यासाठी २१ दिवसांवरून २५ दिवसांपर्यंत केला आहे. तर ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांसाठी ४५ दिवसांपर्यंत अवधी ठेवला आहे.
कनेक्शन आणि सबसिडीचे नियम
काही कुटुंबांना वर्षाला १२ अनुदानित घरगुती सिलिंडर मिळतात. अतिरिक्त सिलिंडरसाठी बाजारभावाप्रमाणे शुल्क आकारले जाईल.
थोडक्यात काय तर… सरकारने आता एलपीजी आणि पीएनजी या दोन्ही गॅसचा एकाच वेळी वापर करणाऱ्यांवर कडक पाळत ठेवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे तुमच्याकडे पीएनजी कनेक्शन असेल, तर कायदेशीर कारवाई किंवा बुकिंग ब्लॉक होण्यापूर्वी तुमचे एलपीजी कनेक्शन ३० जूनच्या आत सरेंडर करणे फायद्याचे ठरेल.






