Rule For Gas Cylinder : ‘हा’ नंबर नसेल तर सिलिंडर मिळणारच नाही; सरकारकडून नवा नियम लागू
Rule For Gas Cylinder : अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे जागतिक पातळीवर मोठे ऊर्जा संकट (Rule For Gas Cylinder) निर्माण झाले आहे. याचा थेट फटका भारतालाही बसत आहे.

Rule For Gas Cylinder : अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे जागतिक पातळीवर मोठे ऊर्जा संकट (Rule For Gas Cylinder) निर्माण झाले आहे. याचा थेट फटका भारतालाही बसत आहे.
भारतात घरगुती एलपीजी सिलिंडरचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. आखाती देशांतून येणाऱ्या नैसर्गिक वायू आणि एलपीजीच्या पुरवठ्यात व्यत्यय आल्याने ही समस्या उद्भवली आहे.
युद्धामुळे स्ट्रेट ऑफ होर्मुझ सारख्या महत्वाच्या मार्गावर (Rule For Gas Cylinder) परिणाम झाल्याने भारतात एलपीजी आयात प्रभावित झाली आहे. परिणामी, लोकांना वेळेवर गॅस सिलिंडर मिळत नाहीये. गॅस सिलिंडर बुक केल्यानंतरही सामान्य नागरिकांना चार ते सात दिवस किंवा त्याहून अधिक वेळ वाट पाहावी लागत आहे.
या स्थितीचा फायदा घेत अनेक ठिकाणी गॅस सिलिंडरचा काळाबाजार जोरात सुरू आहे. यामुळे सामान्य माणसाला महागाईचा आणि फसवणुकीचा सामना करावा लागत आहे. Rule For Gas Cylinder
या पार्श्वभूमीवर, काळाबाजार आणि डिलिव्हरीमध्ये (Rule For Gas Cylinder) होणाऱ्या गैरप्रकारांना आळा बसावा म्हणून केंद्र सरकारने गॅस सिलिंडर बुकिंग आणि डिलिव्हरी प्रक्रियेत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
सरकारचा नवा निर्णय: DAC नंबर अनिवार्य
काळाबाजार रोखण्यासाठी सरकारने डिलिव्हरी ऑथेंटिफिकेशन कोड (DAC नंबर) प्रणाली आणली आणि तिला व्यापक स्वरूप दिले आहे. आता गॅस सिलिंडर बुक केल्यानंतर प्रत्येक ग्राहकाला एक DAC नंबर मिळेल. हा नंबर डिलिव्हरी बॉयला दिल्याशिवाय सिलिंडर देण्यात येणार नाही.
तुमच्याकडे DAC नंबर नसेल तर गॅस सिलिंडर मिळणार नाही. हा नियम आता देशभरात प्रभावीपणे लागू झाला असून, सध्या साधारण ९२ टक्के गॅस सिलिंडरची डिलिव्हरी DAC नंबरच्या माध्यमातून होत आहे. यामुळे डिलिव्हरी प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुरक्षित झाली आहे.
अलीकडेच DAC नंबरच्या प्रक्रियेत काही तांत्रिक बिघाड झाला होता. त्यानंतर सरकार आणि ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी (OMCs) प्रणालीत अपडेट केले. या अपडेटमुळे आता डिलिव्हरीची प्रक्रिया अधिक सोपी आणि विश्वासार्ह झाली आहे. बुकिंग केलेल्या डिव्हाइसवर (मोबाइल, व्हॉट्सॲप किंवा ईमेल) DAC नंबर पाठवला जातो.
DAC नंबर कसा मिळेल आणि कसा वापरायचा?
- गॅस सिलिंडर बुकिंग करण्यासाठी तुम्ही कॉल, एसएमएस, ॲप किंवा ऑनलाइन पद्धती वापरा.
- बुकिंग केल्यानंतर थोडा वेळ प्रतीक्षा करा.
- तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर, बुकिंग केलेल्या डिव्हाइसवर किंवा व्हॉट्सॲप/ईमेलवर DAC नंबर येईल.
- जेव्हा गॅस डिलिव्हरी बॉय तुमच्याकडे सिलिंडर घेऊन येईल, तेव्हा तुम्ही हा DAC नंबर त्याला सांगावा.
- DAC नंबर तपासल्यानंतरच सिलिंडर तुम्हाला दिले जाईल.
ही प्रणाली डिलिव्हरी एजंट्सकडून होणारी गैरप्रकार, सिलिंडरची चोरी किंवा काळाबाजार रोखण्यासाठी उपयुक्त ठरत आहे. या निर्णयामुळे सामान्य नागरिकांना गॅस सिलिंडर मिळण्याची प्रक्रिया अधिक सोपी आणि सुरक्षित होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






