Shambhuraj Desai: पालकमंत्र्यांच्या ‘कोयना दौलत’मध्ये गणरायाचे भक्तिभावाने स्वागत; देसाई परिवाराकडून पारंपरिक पद्धतीने गणेशपूजा
Shambhuraj Desai ‘गणपती बाप्पा मोरया... मंगलमूर्ती मोरया...’च्या जयघोषात पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या कोयना दौलत येथील निवासस्थानी सोमवारी लाडक्या गणरायाचे वाजतगाजत आगमन झाले.

Shambhuraj Desai: ‘गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया…’च्या जयघोषात पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या कोयना दौलत येथील निवासस्थानी सोमवारी लाडक्या गणरायाचे वाजतगाजत आगमन झाले. यावेळी दुष्काळाचे संकट दूर करून जिल्ह्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेला सुख-समृद्धी लाभावी, असे साकडे पालकमंत्री देसाई यांनी गणरायाच्या चरणी घातले.
यावेळी पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणरायाची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत ढोल-ताशांचा निनाद आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. भक्तांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कोयना दौलत येथे उत्सवी वातावरण निर्माण झाले.
लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई, रविराज देसाई यांच्यासह देसाई परिवाराने गणरायाचे मनोभावे स्वागत केले. परिवारातील महिलांनी औक्षण करून बाप्पाची पूजा केली. त्यानंतर विधिवत पूजा-अर्चा आणि आरती करण्यात आली.
यावेळी पालकमंत्री देसाई यांनी जिल्ह्यातील पाऊस-पाण्याचे संकट दूर होऊन जलसाठे भरावेत, शेतकर्यांच्या पिकांना मुबलक पाणी मिळावे आणि दुष्काळाचे सावट दूर व्हावे, सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि एकोप्याची भावना अधिक दृढ व्हावी, तसेच सर्वांच्या जीवनातील संकटे दूर व्हावीत, अशी प्रार्थना ना. देसाई यांनी गणरायाच्या चरणी केली.





