Lonikand Accident : काळजाचा थरकाप! कार पार्किंग करताना चिमुरडीचा चिरडून मृत्यू; नेमकं काय घडलं?
Lonikand Accident : शेडमध्ये झोपलेल्या ९ वर्षीय मुलीच्या अंगावरून वाहन गेल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना लोणीकंद परिसरातील वढूखुर्द येथे घडली.
Updated On:

Lonikand Accident – चारचाकी लावताना शेडमध्ये झोपलेल्या ९ वर्षीय मुलीच्या अंगावरून वाहन गेल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना लोणीकंद परिसरातील वढूखुर्द येथे घडली. मैराबी रसुलसाब बळीगर ( ९) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. याबाबत लालसाहेब महमंदसाब कालेगार ( ३९, रा. लोणीकंद, मूळ जुमलापूर, कर्नाटक) यांनी तक्रार दिली असून त्यानुसार चारचाकी चालक भरत रमेश नेहेते ( ४६, रा. रामनगर, वढूखुर्द) याच्याविरुद्ध लोणीकंद ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, मैराबी हिचे आई-वडील मजूर आहेत. वढूखुर्द येथील एका इमारतीचे बांधकामावर ते काम करतात. मैराबी ही बांधकामाजवळच्या पत्र्याच्या शेडमध्ये झोपली होती.दरम्यान, कार चालक नेहेते हे चारचाकी पार्क करण्यासाठी वाहन लावत होते. त्यावेळी अंधार असल्याने शेडमध्ये मैराबी झोपल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही. तिच्या अंगावरून चारचाकी गेल्याने ती गंभीर जखमी झाली. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक घोडके करत आहेत.





