Ekta Kapoor : लांब केस, लाल साडी अन् भयावह चेहरा… एकता कपूरच्या नवा हॉरर चित्रपटाची पहिली झलक समोर
Ekta Kapoor : भयानक चेहऱ्यामागे नेमकी कोणती अभिनेत्री ?

Ekta Kapoor : एकता कपूरचा नवा हॉरर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अमर बुटाला यांच्यासह एकताने ‘हीरो की हॉररिन’ या मोठ्या हॉरर चित्रपटाचे शीर्षक आणि फर्स्ट लूक पोस्टर समोर आणला आहे. साजिद खानच्या दिग्दर्शनातील या भयपटाची पहिली झलक फारच भयानक आहे.
चित्रपटाच्या पहिल्या लूक पोस्टरमध्ये एका स्त्रीचा अतिशय भयानक आणि भयावह अवतार दिसत आहे. तिचे विस्कटलेले लांब केस, रक्ताने माखलेली लाल साडी, पांढरे डोळे, टोकदार सुळे आणि विद्रुप चेहरा अचानक प्रेक्षकांच्या समोर येताच अनेकांच्या काळजाचा ठोका चुकतो. मात्र या भयानक चेहऱ्यामागे नेमकी कोणती अभिनेत्री आहे? याबाबत कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही.
शोभा कपूर, एकता कपूर आणि अमर बुटाला यांच्या निर्मितीखाली बनत असलेला हा चित्रपट वर्ष २०२७ मध्ये मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.
काय आहे ‘फ्रायडे द १३’?
जेव्हा महिन्याच्या १३ तारखेला शुक्रवारी येतो तेव्हा पाश्चिमात्य देशांत त्याला ‘फ्रायडे द १३’ म्हणतात. जुन्या मान्यतेनुसार हा दिवस अशुभ किंवा भीतीदायक मानला जातो. याच भीतीचा वापर करत निर्मात्यांनी शुक्रवार, १३ तारखेच्या दिवशी या भयपटाची पहिली झलक दाखवली आहे. त्यामुळे आता एकता कपूरच्या या हॉरर चित्रपटाची अनेकांना उत्सुकता लागली आहे.
Chitrangada Singh : सलमान खानसोबत काम करताना चित्रांगदाला वाटली होती भीती; सांगितला खास अनुभव





