Chitrangada Singh : सलमान खानसोबत काम करताना चित्रांगदाला वाटली होती भीती; सांगितला खास अनुभव
Chitrangada Singh : नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत चित्रांगदा सिंहने सलमान खानसोबत काम करण्याचा तिचा अनुभव सांगितला.

Chitrangada Singh : बॉलिवूडचा भाईजान अर्थात अभिनेता सलमान खान त्याच्या आगामी ‘मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात सलमानसोबत अभिनेत्री चित्रांगदा सिंह मुख्य भूमिकेत झळकणार आहे.
काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. त्यामध्ये दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली असून या नव्या जोडीला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
दरम्यान, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत चित्रांगदा सिंहने सलमान खानसोबत काम करण्याचा तिचा अनुभव सांगितला. सलमानची पडद्यावरील दमदार उपस्थिती आणि कॅमेऱ्यासमोरचा आत्मविश्वास पाहून सुरुवातीला आपण थोडे दडपणाखाली होतो, अशी कबुली तिने दिली. मात्र, काही काळानंतर त्याच्यासोबत काम करणे सोपे आणि आनंददायी वाटू लागल्याचेही तिने सांगितले.
चित्रांगदाने सलमानचे कौतुक करताना म्हटले की, “त्याच्यामध्ये आपल्या सहकलाकारांमधील सर्वोत्तम गुण बाहेर आणण्याची खास क्षमता आहे. सलमान खानसोबत काम करणे हा खरोखरच सुंदर आणि अविस्मरणीय अनुभव होता.”
ती पुढे म्हणाली की, “सलमानची उपस्थिती अत्यंत प्रभावी आहे. कॅमेऱ्यासमोर तो ज्या सहजतेने आणि आत्मविश्वासाने वावरतो, ते पाहून सुरुवातीला ती थोडी घाबरली होती. मात्र, त्याच्या काम करण्याच्या पद्धतीतील सहजतेमुळे त्याच्यासोबत एकाच फ्रेममध्ये काम करणे आनंददायी ठरले. त्याच्यामुळे प्रत्येक दृश्यात एक वेगळी नैसर्गिक ऊर्जा निर्माण होते.”
‘मातृभूमी’मधील गाणी प्रदर्शित झाल्यानंतर सलमान आणि चित्रांगदा यांच्या जोडीला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. आपल्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीला मिळणारे प्रेम पाहून आनंद होत असल्याची भावना तिने व्यक्त केली. आता सलमान आणि चित्रांगदा यांची ही नवी जोडी चित्रपटात कशी दिसणार, याची चाहत्यांना उत्सुकता लागली असून ट्रेलर आणि गाण्यांनंतर या जोडीला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत.
Kangana Ranaut: गांधी कुटुंबावरील पोस्टने कंगना अडचणीत; शिमल्यात FIR दाखल, पोलिसांकडून तपास सुरू.





