Lok Sabha Result 2024 Live : अमरावतीतून नवनीत राणा आघाडीवर…

Lok Sabha Result 2024 Live । लोकसभा निवडणुकांचा निकाल आज 4 जून रोजी जाहीर होत आहे. राज्यासह देशभरातील सर्व जागांसाठीची मतमोजणी ८ वाजता सुरू होणार आहे. मतमोजणीच्या ठिकाणची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. अनेक ठिकाणी उमेदवारांसह कार्यकर्त्यांची उत्सुकता वाढली आहे.
तर सलग तिसऱ्यांदा विजयी होण्यासाठी भाजपने देखील तयारी केली आहे. भाजपने दिलेला 400 पार चा नारा खरा ठरणार का? हे देखील आजच्या निकालावरून स्पष्ट होणार आहे. राज्यात एकूण पाच टप्प्यात लोकसभा निवडणूक पार पडली. पहिल्या टप्प्यात 5 मतदारसंघात मतदान पार पडले. तर, शेवटच्या टप्प्यात एकूण 13 मतदारसंघात मतदान झाले. महाराष्ट्रात एकूण 48 जागांवर मतदान पार पडले.
>> अमरावतीतून नवनीत राणा आघाडीवर
अमरावतीतून नवनीत राणा 10 हजार 344 मतांनी आघाडीवर आहेत. त्यांना आतापर्यंत 1 लाख 57 हजार 118 मत मिळाली आहेत. तर बळवंत वानखडेंना 1 लाख 46 हजार 774 मतं मिळाली आहेत.
> भंडारा – गोंदिया लोकसभा मतदारसंघ
भंडारा – गोंदिया लोकसभा मतदारसंघातून सुनील मेंढे आघाडीवर तर महाविकास आघाडीचे डॉ. प्रशांत पडोळे पिछाडीवर आहेत.
>> अमरावती लोकसभा मतदार संघ
महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांनी अमरावती मतदार संघातून आघाडी घेतली आहे. सुरुवातीच्या कलानुसार काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे हे आघाडीवर होते. मात्र आता नवनीत राणा 5600 मतांनी पुढे आल्या आहेत.
> बुलढाणा लोकसभा मतदार संघ
प्रतापराव जाधव 16 हजार मतांनी आघाडीवर आहेत.
>> गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघ
काँग्रेसचे डॉ. नामदेव कीरसान यांना आतापर्यंत 61162 मते मिळाली आहेत. तर, भाजपचे अशोक नेते यांना 52 हजार 309 मते मिळाली आहेत. डॉ. नामदेव कीरसान हे 8853 मतांनी आघाडीवर आहेत.
>> यवतमाळ लोकसभा मतदार संघ
यवतमाळ लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडीचे संजय देशमुख यांनी पाचव्या फेरीअखेर 11369 मते मिळाली आहेत. महायुतीच्या राजश्रीताई पाटील यांनी 84287 मते घेतली आहेत.
>> वर्ध्यात अमर काळे यांची आघाडी
वर्धा लोकसभा मतदारसंघात सातव्या फेरी अखेर अमर काळे यांनी 16586 मतांची आघाडी घेतली आहे. अमर काळे यांना 1,54,393 मते तर रामदास तडस यांना 1,37, 807 मते मिळाली आहेत.
> रामटेक लोकसभा मतदार संघ
काँग्रेसचे उमेदवार श्याम कुमार बर्वे हे पाचव्या फेरीनंतर १८ हजार मतांनी पुढे आहेत.
चंद्रपूरमधून प्रतिभा धानोरकर 27 हजारांनी आघाडीवर
चंद्रपूर लोकसभा मतदार संघातून तिसरी फेरीत काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर आघाडीवर आहेत. येथून प्रतिभा धानोरकर यांची लढत भाजपचे सुधीर मुंनगटीवार यांच्यासोबत आहे. सध्या येथील राजुरा, बल्लारपूर, चंद्रपूर व वणी या चार विधानसभा क्षेत्रात काँग्रेस प्रत्येक फेरीत आघाडीवर आहे.
>> रामटेक लोकसभा मतदार संघ
- राजू पारवे- 4696
– श्यामकुमार बर्वे- 4344
>> नागपूरमधून 11675 मतांनी नितीन गडकरी आघाडीवर
नितीन गडकरी – 40856
विकास ठाकरे- 29181
>> भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघ
भाजपा सुनील मेंढे – 18857
काँग्रेस प्रशांत पडोळे 17846
> अमरावतीतून नवनीत राणा पिछाडीवर
अमरावतीत आतापर्यंत झालेल्या लोकसभा मतदार संघातून महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा पिछाडीवर असल्याचे दिसत आहे. तर काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांना पहिल्या कलामध्ये आघाडी मिळाली आहे. दरम्यान अमरावतीत तिहेरी लढत पाहायला मिळाली. प्रहार कडून दिनेश बुब यांना मैदानात उतरवण्यात आले होते.
बुलढाण्यात प्रतापराव जाधव यांची आघाडी
बुलढाण्यातून प्रतापराव जाधव यांची आघाडी पाहायला मिळत आहे. २८६ मतांवर प्रतापराव जाधव यांनी आघाडी घेतल्याचे पाहायला मिळाले.
– प्रतापराव जाधव ४२८१
– रविकांत तुपकर ३९५५
– नरेंद्र खेडेकर ३२२७
– वसंतराव मगर १५१४
रामटेक लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे श्याम कुमार बर्वे आघाडीवर
काँग्रेसचे श्याम कुमार बर्वे हे पहिल्या फेरीनंतर सुमारे 6000 मतांनी आघाडीवर असल्याचे दिसत आहे.
>> Lok Sabha Election Result 2024 : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून संजय देशमुख आघाडीवर
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी एकूण ८४ टेबलवर मतमोजणीला सुरुवात झाली आहे. यात महाविकास आघाडीचे संजय देशमुख यांना ३ हजार ६२५ तर महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांना ३ हजार ५४१ मते मिळाली आहे. ८४ मतांनी संजय देशमुख आघाडीवर असल्याचे दिसत आहे.
Lok Sabha Election Result 2024 : अकाेला लाेकसभा मतदार संघातून भाजपचे उमेदवार अनुप धाेत्रे आघाडीवर
अकोल्यात भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे, महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ.अभय पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर रिंगणात उभे आहेत. यंदाची लढत अत्यंत अटीतटीची होणार असल्याची शक्यता निकालाच्या आधीपासूनच वर्तविण्यात येत हाेती. मात्र भाजपाने पहिल्या फेरीत आघाडी घेतल्याचे दिसत आहे.
>> Nagpur Lok Sabha Election Result 2024 : नागपुरातून नितीन गडकरी आघाडीवर आहेत.
Nagpur Lok Sabha Election Result 2024 :नितीन गडकरी नागपूरमध्ये हॅट्रिक करणार ?
यात विदर्भातील नागपूर, चंद्रपूर या निवडणुकांमध्ये तगडी लढत पाहायला मिळाली. नितीन गडकरी यांनी नागपूरमधून २०१४, २०१९ ची निवडणूक जिंकली आहे. आता २०२४ ची निवडणूक जिंकली तर ते नागपूरमध्ये हॅट्रिक साधणारे दुसरे नेते ठरतील. यावेळी त्यांच्या विरोधात विकास ठाकरे रिंगणात आहे.
नागपूरसह बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, यवतमाळ – वाशिम या लोकसभा मतदार संघातील अपडेट येथे जाणून घेणार आहोत.
Amravati Lok Sabha Election Result 2024 : अमरावतीत तिहेरी लढत
अमरावती लोकसभा निवडणूकीत विद्यमान खासदार नवनीत राणा, काँग्रेस आमदार बळवंत वानखेडे आणि प्रहार संघटनेचे दिनेश बुब यांच्यात लढत होत आहे. आमदार बच्चू कडू यांनी महायतीकडून देण्यात आलेल्या नवनीत राणा यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. त्यामुळे या मतदार संघातील राणा आणि बच्चू कडू यांच्यातील वाद चर्चेत आले.





