Lok Sabha Result 2024 Live : नंदुरबारमधून काँग्रेस उमेदवार गोवल पाडवी विजयी

Lok Sabha Result 2024 Live । लोकसभा निवडणुका एकुण सात टप्प्यात पार पडेल. 19 एप्रिलपासून सुरू झालेली मतदानप्रक्रिया 1 जून रोजी संपली. या निवडणुकीत 64.2 कोटी मतदारांनी मतदान केले आहे. या निवडणुकीत एकूण 31.2 कोटी महिलांनी मतदानाचा अधिकार बजावला.अर्थातच त्यानंतर सर्वांच उत्सुकता निकाली लागली होती. तोच लोकसभा निवडणुकीक निकाल आज 4 जून रोजी जाहीर होणार आहे. देशातील लोकसभा निवडणुकांची मतमोजणी काही वेळात सुरू होणार आहे.
दरम्यान, राज्यात एकूण पाच टप्प्यात लोकसभा निवडणूक पार पडली. पहिल्या टप्प्यात 5 मतदारसंघात मतदान पार पडले. तर, शेवटच्या टप्प्यात एकूण 13 मतदारसंघात मतदान झाले. महाराष्ट्रात एकूण 48 जागांवर मतदान पार पडले. त्यातील उत्तर महाराष्ट्रमध्ये , शिर्डी, अहमदनगर, धुळे नाशिक, दिंडोरी, जळगाव, नंदुरबार, रावेर या 8 मतदार संघाचा समावेश आहे.
>> नंदुरबारमधून काँग्रेस उमेदवार गोवल पाडवी विजयी
गोवल पाडवी यांनी भाजपच्या उमेदवार हिना गावित यांचा दारुण पराभव केला आहे.
>> अहमदनगरमधून निलेश लंके आघाडीवर
आठव्या फेरीमध्ये मिळालेल्या मतानुसार,
सुजय विखे पाटील, भाजप उमेदवार – 202710
निलेश लंके, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष – 207518
निलेश लंके राष्ट्रवादी काँग्रेस 4808 – मतांनी आघाडीवर
> नंदुरबारमध्ये गोवल पाडवी यांची मोठी आघाडी
नंदुरबार लोकसभा मतदार संघात काँग्रेस उमेदवार गोवल पाडवी यांनी १ लाख ३९ हजार मताने आघाडी घेतली आहे. त्यामुळे भाजपच्या उमेदवार हिना गावित यांना धक्का बसण्याची शक्यता आहे. दोनदा विजयी झालेल्या हिना गवित यांना नंदुरबारमधून भाजपने तिसऱ्यांदा उमेदवारी दिली होती.
>> शिर्डी लोकसभा निवडणुकीच्या आठव्या फेरीत भाऊसाहेब वाकचौरे ३१९९७ मतांनी आघाडीवर
वाकचौरे – २२४६९१
लोखंडे – १९२६९४
रुपवते – ४३९९१
>> रावेरमध्ये रक्षा खडसे यांची आघाडी कायम
रावेर लोकसभा मतदार संघात पाचव्या फेरीत मिळालेल्या मतानुसार,
रक्षा खडसे – 206569
श्रीराम पाटील- 131143
सध्या 75426 मतांनी रक्षा खडसे आघाडीवर आहेत
> शिर्डी लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या फेरीत भाऊसाहेब वाकचौरे आघाडीवर
सहाव्या फेरीत मिळालेली मते
वाकचौरे – १३७३८९
लोखंडे – १२२४४६
रुपवते – ३२३२९
>> अहमदनगरमध्ये पाचव्या फेरीतही सुजय विखे पाटील आघाडीवर
सुजय विखे पाटील – 131211
निलेश लंके – 121348. सुजय विखे पाटील 9863 मतांनी आघाडीवर आहेत.
>> नंदुबारचे काँग्रेस उमेदवार गोवल पाडवी एक लाख मतांनी आघाडीवर
काँग्रेस उमेदवार गोवल पाडवी यांना आठवी फेऱ्यात १ लाख ०५ हजार मतांनी आघाडी मिळाली आहे.
>> नाशिक लोकसभा मतदार संघ
राजाभाऊ वाजे 223221
हेमंत गोडसे 151889
राजाभाऊ वाजे 71332 मतांनी आघाडीवर
>> धुळे – सुभाष भामरे आघाडीवर
>> दिंडोरी लोकसभा मतदार संघात भारती पवार पिछाडीवर
>> शिर्डी लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या फेरीत भाऊसाहेब वाकचौरे ६४२५ मतांनी आघाडीवर
चौथ्या फेरीत मिळालेली मते
वाकचौरे – ९००१७
लोखंडे – ८३५९२
रुपवते – २१०८२
> दिंडोरी लोकसभा मतदारसंघ
भास्करराव भगरे यांना पाचव्या फेरीनुसार 120763 यांनी इतकी मत आणि भारती पवार यांना 107462 मिळाली आहेत.
>> अहमदनगर मध्ये पाचव्या फेरीत सुजय विखे पाटील यांची आघाडी
सुजय विखे पाटील यांनी 12353ची आघाडी घेतल्याचे पाहायला मिळत आहे.
>> शिर्डी लोकसभा मतमोजणीच्या दुसऱ्या फेरीचा निकाल हाती
शिर्डी लोकसभा मतमोजणीच्या दुसऱ्या फेरीचा निकाल हाती आला असून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे 4154 मतांनी आघाडीवर आहेत. त्यांना दुसऱ्या फेरीअखेरीस 46323 मते मिळाले आहे. तर शिंदे गटाचे उमेदवार सदाशिव लोखंडे पिछाडीवर आहेत. त्यांना दुसऱ्या फेरीअखेर 42169 मते मिळाले आहे. वंचितच्या उमेदवार उत्कर्ष रूपवते यांना दुसऱ्या फेरीअखेर 5526 मते मिळाली आहे.
>> तिसऱ्या फेरी सुजय विखे 7093 मतांनी आघाडीवर
>> जळगावमध्ये स्मिता वाघ आघाडीवर
स्मिता वाघ – ४२३७५
करण पवार – २१८७२
>>शिर्डी लोकसभा मतदार संघातून भाऊसाहेब वाकचौरे आघडीवर
भाऊसाहेब वाकचौरे :- 30,960 आघाडीवर
सदाशिव लोखंडे :- 28,666 पिछाडीवर
उत्कर्ष रूपवते :- 6,893 पिछाडीवर
>> अहमदनगरमधून सुजय विखे आघाडीवर
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लक्षवेधी ठरली आहे. महायुती भाजपकडून खासदार सुजय विखे यांच्यासमोर शरद पवार यांनी माजी आमदार नीलेश लंके यांना उभे केले. लोकसभा मतदानादरम्यान येथे पैसे वाटप झाल्याचा आरोपही लंके यांच्याकडून करण्यात आला होता. त्यामुळे अहदनगरमध्ये धनशक्तीविरुद्ध जनशक्ती, असा नारा देत लंकेंनी विखेंना आव्हान दिले आहे. सध्या अहमदनगरमधून सुजय विखे आघाडीवर असल्याचे दिसत आहे. भाजपाचे डॉ. सुजय विखे पाटील हे 833 मतांनी आघाडीवर आहेत.
Lok Sabha Result 2024 Live >> धुळ्यातून शोभा बच्छाव आघाडीवर
Lok Sabha Result 2024 Live >> रावेरमध्ये रक्षा खडसे आघाडीवर आहेत
Lok Sabha Result 2024 Live >> बुलढाण्यात प्रतापराव जाधव आघाडीवर आहेत
Lok Sabha Result 2024 Live >> धुळ्यातून भाजपचे सुभाष भामरे यांनी आघाडी घेतली आहे.
Nashik Lok Sabha Result 2024 Live >> नाशिकमधून महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे आघाडीवर, तर विद्यमान खासदार हेमंत गोडसे पिछाडीवर
>> दिंडोरी मतदारसंघातून महाविकास आघाडीचे भास्कर भगरे आघाडीवर आहेत.
Nashik Lok Sabha Result 2024 Live >> नाशिक व दिंडोरी या दोन्ही मतदारसंघात पोस्टल मतांची मोजणी सुरू
नाशिक व दिंडोरी या दोन्ही मतदारसंघात पोस्टल व होम बॅलेट मतांची मोजणी सुरू झालेली आहे. मतमोजणी केंद्रावर उमेदवारांच्या समर्थकांची मोठ्या संख्येने गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे.
तर निकालापूर्वी दिंडोरी मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनासाठी दाखल झाले आहे. दिंडोरीत भास्कर भगरेविरुद्ध केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांच्यात चुरशीची लढत आहे.
Nashik Lok Sabha Result 2024 Live – नाशिकमध्ये मतमोजणीदरम्यान गोंधळ
नाशिकमध्ये मतमोजणी सुरु होण्यापूर्वीच केंद्रावर गोंधळ निर्माण झाला होता. उमेदवारांच्या प्रतिनिधीने ईव्हीएम मशिनची माहिती आणि काही कागदपत्रं आतसोबत नेण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे येथे गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, नाशिक मतदारसंघात शिवसेना (शिंदे गट) हेमंत गोडसे आणि शिवसेना (ठाकरे गट) राजाभाऊ वाजे यांच्यात लढत आहे.





