Lok Sabha Result 2024 Live : इंदूरमध्ये NOTA ला जवळपास 1 लाख ‘मते’
Updated On:

Lok Sabha Result 2024 Live । इंदूरमधील मतदारांनी नोटाला वोट करण्यात आले आहे. येथे NOTA दुसऱ्या स्थानावर आहे. NOTA ला 96 हजार मते मिळाली आहेत.
भाजपचे शंकर लालवानी आघाडीवर आहेत. हैदराबादमध्ये असदुद्दीन ओवेसी ४६८९१ मतांनी आघाडीवर आहे. भाजपच्या माधवी लता पिछाडीवर आहे.
सुलतानपूरमधून भाजपच्या मनेका गांधी पिछाडीवर आहेत. केरळमध्ये भाजप 2 जागांवर आघाडीवर आहे. सुरेश गोपी त्रिशूरमध्ये तर राजीव चंद्रशेखर तिरुवनंतपुरममध्ये आघाडीवर आहेत.
भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री एल मुरुगन निलगिरीतून पिछाडीवर आहेत. द्रमुकचे ए राजा आघाडीवर आहेत. द्रमुकच्या कनिमोझी थुथुकुडीमध्ये ७४,००० हून अधिक मतांनी आघाडीवर आहेत.
चंदीगडमध्ये काँग्रेसचे उमेदवार मनीष तिवारी पुढे आहेत. मुझफ्फरनगरमध्ये संजीव बालियान पिछाडीवर आहेत. फिरोजाबादमध्ये सपाचे अक्षय यादव आघाडीवर आहेत.




