Lok Sabha Result 2024 । मोठी बातमी.! लोकसभेच्या निकालावर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिकिया, म्हणाले….

Lok Sabha Result 2024 | Narendra Modi : लोकसभा निवडणूकाचे निकालांनी राजकारणात रंगत आणली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील होऊ घातलेले तिसरे सरकार बहुमतापासून दूर राहिल्याचं दिसून येत आहे.
साल 2014 आणि 2019 च्या निवडणूक निकालांच्या विपरित यंदाचे निकाल आले आहेत. यावेळी भाजपाला 272 चा जादूई गटाचा आकडा गाठता आलेला नाही. सत्ताधारी एनडीएला 296 जागांवर आघाडीवर आहे. तर इंडिया आघाडीला जवळपास 228 जागांवर आघाडी मिळतेय.
दरम्यान, आजच्या या निकालावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. सोशल मीडियावर मोदींनी ट्विटकरत आजच्या या निकालावर भाष्य केलं असून, सर्वांचे आभार देखील मानले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच ट्विट, पाहा काय म्हणाले…..
‘देशातील जनतेने सलग तिसऱ्यांदा एनडीएवर विश्वास व्यक्त केला आहे. भारताच्या इतिहासातील हा अभूतपूर्व क्षण आहे. या प्रेम आणि आशीर्वादासाठी मी माझ्या कुटुंबियांना प्रणाम करतो.
देश की जनता-जनार्दन ने एनडीए पर लगातार तीसरी बार अपना विश्वास जताया है।
भारत के इतिहास में ये एक अभूतपूर्व पल है।
मैं इस स्नेह और आशीर्वाद के लिए अपने परिवारजनों को नमन करता हूं।मैं देशवासियों को विश्वास दिलाता हूं कि उनकी आकांक्षाओं को पूरा करने के लिए हम नई ऊर्जा, नई…
— Narendra Modi (@narendramodi) June 4, 2024
मी देशवासियांना खात्री देतो की त्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही नवीन ऊर्जा, नवीन उत्साह आणि नवीन संकल्प घेऊन पुढे जाऊ. मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो आणि सर्व कार्यकर्त्यांनी केलेल्या समर्पण आणि अथक परिश्रमाबद्दल त्यांचे अभिनंदन करतो.’ या आशयाचे ट्विट पंतप्रधान मोदींनी केलं आहे.





