Lok Sabha Election 2024 | लोकसभा निवडणूक-2024 चे निकाल आज संपूर्ण जगासमोर असणार आहेत. भारताची ही सार्वत्रिक निवडणूक ७ टप्प्यात पार पडली. लोकसभा निवडणुकीच्या पूर्ततेनंतर जाहीर झालेल्या बहुतांश एक्झिट पोलमध्ये एनडीएला आघाडी मिळण्याचा अंदाज आहे, तर विरोधी आघाडी भारताने 295 पेक्षा जास्त जागा मिळवण्याचा दावा केला आहे. आज सकाळी ८ वाजल्या पासून निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर (Eci.gov.in, Results.eci.gov.in) ट्रेंड दिसण्यास सुरुवात होईल. https://www.dainikprabhat.com/ या LIVE वर तुम्हाला निवडणूक निकालांशी संबंधित सर्व अपडेट्स मिळतील. लोकशाहीचा सर्वात मोठा सण, लोकसभा निवडणूक 2024 च्या निकालांचे सर्वात जलद आणि विश्वासार्ह लाइव्ह अपडेट येथे जाणून घ्या. दरम्यान महाराष्ट्रात तब्बल 48 लोकसभा मतदारसंघ आहे. उत्तर प्रदेशनंतर लोकसभेच्या सर्वाधिक जागा महाराष्ट्रात असून, महाराष्ट्रातील जनतेचा जनादेश कुणाला आहे, हे हळूहळू स्पष्ट होत आहे. Lok Sabha Election 2024 महाराष्ट्रातील मुंबई (6) – दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर मुंबई, ईशान्य मुंबई, उत्तर मध्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई. येथील लाईव्ह अपडेट येथे जाणून घ्या. उत्तर मध्य मुंबई भाजपाचे उज्वल निकम हे 23 हजार मतांनी आघाडीवर काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्यासाठी हा धक्का आहे. उत्तर मुंबई भाजपाचे उमेदवार पीयूष गोयल हे 49 हजार मतांनी आघाडीवर काँग्रेसचे भूषण पाटील हे पिछाडीवर आहेत. उत्तर पूर्व मुंबई म्हणजे ईशान्य मुंबईतून ठाकरे गटाचे संजय दीना पाटील हे 18 हजार मतांनी आघाडीवर भाजपाचे मिहिर कोटेचा पिछाडीवर आहेत. दक्षिण मुंबई ठाकरे गटाचे अरविंद सावंत 6 हजार मतांनी आघाडीवर शिवसेना शिंदे गटाच्या यामिनी जाधव पिछाडीवर दक्षिण मध्य मुंबई ठाकरे गटाचे अनिल देसाई 10 हजार मतांनी आघाडीवर शिवसेना शिंदे गटाचे राहुल शेवाळे पिछाडीवर उत्तर पश्चिम मुंबई शिवसेना शिंदे गटाचे रवींद्र वायकर 5 हजार मतांनी आघाडीवर ठाकरे गटाचे अमोल किर्तीकर पिछाडीवर