Lok Sabha Election Result 2024 Live । तिसऱ्या फेरीत शिवसेना सहा जागांवर आघाडीवर नितीन गडकरी, पियुष गोयल आणि राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) उमेदवार सुप्रिया सुळे आपापल्या लोकसभा मतदारसंघात पुढे आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे कल्याण लोकसभा मतदारसंघातून आघाडीवर आहेत. शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना सहा जागांवर आघाडीवर आहे. बीडमधून भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे पिछाडीवर आहेत. नागपुरातून तिसऱ्यांदा निवडणूक लढवणारे गडकरी काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांच्या पुढे आहेत. मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार भूषण पाटील यांच्यापेक्षा पियुष गोयल आघाडीवर आहेत. बारामतीमध्ये शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे त्यांच्या वहिनी आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यावर आघाडीवर आहेत.