Lok Sabha Election Result 2024 । लोकसभेच्या निकालाबाबत आशिष शेलारांचं मोठं विधान, स्पष्टच म्हणाले….

Lok Sabha Election Result 2024 । Ashish Shelar – लोकसभा निवडणुकीत राज्यात अनेक वाईट गोष्टींचा प्रचार करण्यात आला. त्याचा भारतीय जनता पार्टीला फटका बसला असा दावा पक्षाचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला आहे.
तर शरद पवार यांनाही त्यांचे चारच खासदार निवडून येतील असे वाटत होते. मात्र अनपेक्षितपणे त्यांचे जास्त खासदार निवडून आले असेही शेलार यांनी म्हटले आहे.
शेलार म्हणाले की राज्यात अगदी चुकीच्या पध्दतीने अपप्रचार करण्यात आला व त्यामुळे भाजपच्या जागा कमी झाल्या. हा निकाल नक्कीच आम्हाला आनंद देणारा नाही. पक्षाच्या सगळ्या विधानसभा आणि विधान परिषद आमदारांना आज मुंबईत बोलावण्यात आले होते.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना मार्गदर्शन केले आणि विजयाची कानमंत्र दिला. पक्षात असलेली अस्वस्थता राज्याच्या मंत्रिमंडळाचा संभाव्य विस्तार आणि एकूणच राज्यातील स्थितीबाबत आज झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली.
दरम्यान, भाजपच्या दादर येथील कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात फडणवीस यांनीही त्यांची भूमिका मांडली. या बैठकीला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेही उपस्थित होते.





