Lok Sabha Election Result । लोकसभा निवडणुकीचा काल निकाल लागला. या निवडणुकीतअनेक धक्कादायक निकाल समोर आले. त्यातच लोकसभेत महाराष्ट्रात 45 च्या पुढे जागा जिंकणार असल्याचा दावा करणाऱ्या महायुतीला मोठा धक्का बसल्याचे दिसून आले. भाजप तर एक अंकी जागेवर आल्याचे दिसून आले. राज्यात महायुतीला केवळ 17 जागांवर विजय मिळाला असून महाविकास आघाडीने 30 जागांवर मुसंडी मारली आहे. त्यामध्ये सर्वाधिक जागा या काँग्रेसने पटकावल्या असून काँग्रेसच्या या यशामध्ये विदर्भाचा मोठा वाटा असून विदर्भात काँग्रेसला पाच जागा मिळाल्या आहेत. राज्यात कोणत्या पक्षाला किती जागा? राज्यात महाविकास आघाडीला 30 जागा मिळाल्या असून त्यामध्ये 13 जागा काँग्रेसला मिळाल्या आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना ठाकरे गट असून त्यांना 9 जागा मिळाल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर शरद पवारांची राष्ट्रवादी असून त्यांना 8 जागा मिळाल्या आहेत. विशेष म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीने फक्त 10 जागा लढवल्या असून त्यापैकी आठ जागांवर विजय मिळवलाय. महायुतीला 17 जागा Lok Sabha Election Result । गेल्या वेळी 42 जागा मिळवणाऱ्या भाजप-शिवसेना युतीने यंदा 45 जागा जिंकण्याचं ध्येय ठेवलं होतं. पण यावेळी त्यांना फक्त 18 जागा महायुतीला मिळाल्या आहेत. त्यामध्ये भाजपला 9 जागा, शिंदे गटाला 7 जागा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 1 जागा मिळाली आहे. पश्चिम महाराष्ट्रात पवारांची जादू पश्चिम महाराष्ट्रातील यंदाची लढत निर्णायक होती. राष्ट्रवादीच्या पक्ष फुटीनंतर जनता अजित दादांना साथ देते की शरद पवारांसोबतच राहते हे या निवडणुकीतून स्पष्ट झालं. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला तीन जागांवर विजय मिळाला असून त्यापैकी बारामतीमधील विजय हा सर्वात लक्षवेधी ठरला. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांची पॉवर असल्याचं पहायला मिळालं. प्रतिष्ठेच्या लढाईत शरद पवारांची बाजी Lok Sabha Election Result । राज्यातील सर्वात प्रतिष्ठेच्या बनलेल्या बारामती लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांनी बाजी मारली. सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या नणंद आणि अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर पवारांचे होमग्राउंड कुणाच्या बाजूने याचं उत्तर या निवडणुकीतून मिळालं असून अजित पवारांसाठी हा धक्का असल्याचं मानलं जातंय. हेही वाचा पंकजा मुंडे, रावसाहेब दानवेसह महाराष्ट्रातील ‘या’ दिग्गज नेत्यांचा झाला पराभव