अमित शहा म्हणाले, ‘नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार , 2029 नंतर..’

Lok Sabha Election 2024 । लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी वृत्त वहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत अनेक मुद्द्यांवर आपली मते मांडली आहे. अशात निवडणुकीच्या 3 टप्प्यांसाठी मतदान झाले असून, चौथ्या टप्प्यासाठी आज सोमवारी मतदान होत आहे.
अशातच अमित शाह यांनी दावा केला की, नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत. अमित शहा म्हणाले की, हुकूमशहाचा ट्रॅक रेकॉर्ड आमचा नाही. लोकशाहीसाठी लढणाऱ्या लोकांमध्ये आपण आहोत. आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधींनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना तुरुंगात टाकले होते. काँग्रेस आणीबाणी विसरली का ? असेही ते म्हणाले आहे.
काँग्रेसच्या आश्वासनावर हल्लाबोल करताना अमित शहा पुढे म्हणाले,’राहुलच्या आजीने गरीबी हटाओचा नारा दिला होता. पण गरिबी हटली नाही. तसेच राहुलची हमी पोकळ आहे. काँग्रेसने दिलेले वचन त्यांनी कधीच पूर्ण केले नाही. राहुलच्या दाव्यावर कोणीही विश्वास ठेवत नाही. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की ते पूर्ण झाले आहे’ .
काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल करताना गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, ‘काँग्रेसने आम्हाला विकासाबद्दल सांगू नये. आम्ही 14 कोटी घरांमध्ये शौचालये बांधली. यूपीए राजवटीच्या तुलनेत एनडीएच्या काळात विकासकामे वेगाने झाली. एनडीएच्या काळात विकास दुप्पट झाला.’ असेही ते म्हणाले आहे.
तत्पूर्वी, दिल्ली दारू धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात 10 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मिळाल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले ‘मोदीजी पुढील वर्षी 17 सप्टेंबरला 75 वर्षांचे होत आहेत. 2014 मध्ये मोदीजींनी असा नियम केला होता की भाजपमध्ये जो 75 वर्षांचा असेल त्याला निवृत्त केले जाईल, आधी लालकृष्ण अडवाणी निवृत्त झाले, नंतर मुरली मनोहर जोशी, सुमित्रा महाजन, यशवंत सिन्हा निवृत्त झाले.’
ते पुढे म्हणाले होते की,’आता मोदीजी पुढील वर्षी १७ सप्टेंबरला निवृत्त होणार आहेत. मला भाजपला विचारायचे आहे की तुमचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण आहे? ते म्हणाले की, जर त्यांचे सरकार स्थापन झाले तर ते आधी योगीजींना पुढच्या दोन महिन्यांत विल्हेवाट लावतील आणि नंतर ते मोदीजींचे सर्वात महत्वाचे व्यक्ती अमित शाहजी यांना पंतप्रधान बनवतील. केजरीवाल म्हणाले की, मोदीजी स्वतःसाठी नाही तर अमित शहांसाठी मते मागत आहेत. ते म्हणाले की, मला पदाचा लोभ नाही.’ असा दावा केजरीवाल यांनी केला आहे.
हे वाचलं का ?





