Lok Sabha Election 2024 : नाशिकमध्ये पुन्हा ट्विस्ट; ६ जणांचे उमेदवारी अर्ज अवैध
Updated On:

नाशिक – नाशिक लोकसभा मतदारसंघात पुन्हा ट्विस्ट आला आहे. शांतीगिरी महाराज, अनिल जाधव आणि भक्ती गोडसे यांच्यासह सहा जणांचे उमेदवारी अर्ज बाद झाले आहेत. तर दिंडोरीमधून पाच उमेदवारी अर्ज अवैध ठरले आहेत.
शांतीगिरी महाराजांनी शिवसेना, अनिल जाधव यांनी भाजप, तर भक्ती गोडसेंनीही शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज भरले होते. एबी फॉर्म न जोडल्यामुळे पक्षाकडून दाखल केलेले हे अर्ज बाद झाले,
तर अपक्ष म्हणून उमेदवारी कायम आहे. अर्ज छाननीत नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून एकूण अकरा ११ उमेदवारी अर्ज अवैध ठरले.





