Thane Fire: ठाणे रेल्वे स्थानकाजवळील मार्केटमध्ये आगीचे तांडव, अनेक दुकाने जळून खाक
Thane Fire: काही तासांनी आग आटोक्यात आणण्यात यश

Thane Fire: ठाण्यातील गावदेवी परिसरात असलेल्या भाजी मार्केटमध्ये गुरुवारी पहाटे आग लागल्याची घटना घडली आहे. पहाटे ४ वाजेच्या सुमारास लागलेल्या या आगीत अनेक दुकाने आणि गोडाऊन जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या आगीमुळे परिसरात प्रचंड घबराट निर्माण झाली होती.
गोखले रोडवर असलेल्या मार्केट परिसरात ही आग लागली. अग्निशामक दलाला तातडीने पाचारण करण्यात आले. काही तासांनी आग आटोक्यात आणण्यात यश आले. दरम्यान, या दुर्दैवी घटनेत आग विझवताना अग्निशमन दलाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यासह ठाणे महानगरपालिकेच्या आरक्षकाचा मृत्यू झाला आहे. तर दोन अग्निशमन जवान गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Sharad Pawar : राष्ट्रवादीत नाराजीनाट्य सुरू असल्याची चर्चा! शरद पवार मोठा निर्णय घेणार?
नेहमी गजबजलेले असणारे गावदेवी भाजी मार्केट पहाटेच्या वेळी शांत होते. मात्र, पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास अचानक मार्केटमधून धुराचे लोट निघू लागले आणि पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केलं. या मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर कपड्यांची दुकाने आणि विविध साहित्याची गोडाऊन आहेत. कापड आणि इतर ज्वलनशील साहित्य असल्यामुळे आग अतिशय वेगाने पसरली आणि अनेक दुकाने जळून खाक झाली.
STORY | Massive blaze erupts in Thane market; fireman among two killed
A fireman and a security guard were killed after a massive fire broke out at a market complex near Thane railway station in Maharashtra early on Thursday, officials said.
A “brigade call” (situation… pic.twitter.com/GPwqD5zfh8
— Press Trust of India (@PTI_News) May 21, 2026
आगीचे कारण अस्पष्ट
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे चार वाजता अग्निशामक दलाच्या नियंत्रण कक्षात कॉल आला होता. नेहमी वर्दळ असणाऱ्या गावदेवी भाजी मार्केटमध्ये आग लागल्याची माहिती देण्यात आली. या भागात घरे आणि भाजीपाल्याची दुकाने, कपड्याची दुकाने आणि गोदामही आहेत. Thane Fire
दरम्यान, आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पहाटेच्या वेळी ही घटना घडल्यामुळे मार्केटमध्ये लोकांची गर्दी नव्हती, ज्यामुळे सुदैवाने मोठी जीवितहानी टळल्याचे समजते. मात्र, कपड्यांची दुकाने आणि गोडाऊन जळाल्यामुळे व्यापाऱ्यांचे लाखोंचे आर्थिक नुकसान झाले आहे. Thane Fire
हेही वाचा:





