Lok Sabha Election 2024 : ‘वंचित’चे नाशिकमध्ये ‘मराठा कार्ड’; करण गायकरांना उमेदवारी
Updated On:

अकोला – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीकडून आज उमेदवारांची नववी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत नाशिकसाठी मराठा आंदोलनातील आक्रमक चेहरा करण गायकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर दिंडोरी पाठोपाठ जळगावातून उमेदवार बदलण्याची वेळ वंचित बहुजन आघाडीवर आली आहे.
नाशिकमधून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी मराठा समाजाचे नेते करण गायकर इच्छुक होते. मराठा आंदोलनातील पदाधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती.
यात वंचितकडून मराठा उमेदवार म्हणून करण गायकर यांना उमेदवारी देण्यावर चर्चा झाली होती. आज अखेर यावर शिक्कामोर्तब झाले आहे. वंचित बहुजन आघाडीने आपल्या उमेदवारांच्या नवव्या यादीत करण गायकरांच्या नावाची घोषणा केली आहे.





