आता मोदी सरकार नाही तर …”फिर एक बार एनडीए सरकार” सभागृहात घोषणा

Lok Sabha Election 2024 । लोकसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळाल्यानंतर नव्या सरकारच्या स्थापनेची तयारी जोरात सुरू झाली आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सोबतच, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया ब्लॉकही दिल्लीत सातत्याने बैठका घेत आहे. आज नरेंद्र मोदी सरकार स्थापनेचा दावा करणार आहे. मोदी ९ जून रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेऊ शकतात, असे सांगण्यात येत आहे.
भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) तिसऱ्यांदा बहुमत मिळवले आहे. एनडीए आघाडीने 292 जागा जिंकल्या आहे. मात्र, एकट्या भाजपला बहुमताचा आकडा (272) गाठता आला नाही आणि केवळ 240 जागांवर समाधान मानावे लागले. विरोधी भारत ब्लॉकने 234 जागा जिंकल्या आहेत.
अशात आज नरेंद्र मोदी सरकार स्थापनेचा दावा करणार आहे. आज व्यासपीठावर महाराष्ट्रातील मुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार मंचावर उपस्थित आहे. लोकसभेच्या सभागृहात यावेळी फिर एक बार मोदी सरकार अशा घोषणा न देता फिर एक बार एनडीए असा घोषणा देण्यात आल्या आहे. या घोषणेची आता सर्वत्र चर्चा सुरु आहे.
Lok Sabha Election 2024 । मंचावर उपस्थित नेत्यांची यादी
1. अनुप्रिया पटेल
2. जीतनराम मांझी
3. चिराग पासवान
4. एकनाथ शिंदे
5. अजित पवार
6. नीतीश कुमार
7. चंद्रबाबू नायडू
8. एचडी कुमारस्वामी
9. पवन कल्याण
10. जेपी नड्डा
11. राजनाथ सिंह





