Pune District | 14 डिसेंबरला जुन्नरमध्ये लोक अदालत
Updated On:

जुन्नर, – जुन्नर तालुका विधी सेवा प्राधिकरण व जुन्नर वकील बार असोसिएशनच्या वतीने कायदेविषयक शिबिराचे आयोजन जुन्नर दिवाणी न्यायालयात करण्यात आले होते. यावेळी 14 डिसेंबर रोजी आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये जास्तीतजास्त पक्षकारांनी आपली प्रकरणे तडजोडीने मिटवून घेण्याचे आवाहन तालुका विधी सेवा समिती अध्यक्षा नम्रता बिरादार यांनी केले.
या शिबिरामध्ये सह दिवाणी न्यायाधीश स्वप्ना घुले, वकिल संघटनेचे हेमंत भास्कर, आशिष वानखेडे, अरुण गाडेकर, नीलिमा शेरकर, समकीत नानावटी आदींसह पदाधिकारी वकील, पक्षकार उपस्थित होते.
टॅग्स:





