फिलिपिन्समध्ये लॉकडाऊनचे उल्लंघन बेतले जीवावर; पोलिसांनी घातल्या गोळ्या

डेल नॉर्टे : भारतात 23 मार्चपासून 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन घोषित केलेले असूनही विनाकारन रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांना धडा मिळेल, अशी घटना आता फिलिपिन्समध्ये घडली आहे. लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या एका 63 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला पोलिसांनी गोळ्या घालून ठार केले आहे. विशेष म्हणजे, सरकारने यासाठी पोलिसांना अभ्य दिले आहे.
लॉक डाऊनचे आदेश मोडून सदर ज्येष्ठ नागरिक मद्यधुंद अवस्थेत हातात विळा घेऊन खुलेआम फिरत होता. विनाकारण फिरत असताना पोलिसांनी या व्यक्तीला चेकपॉईंटवर रोखल्यानंतर त्याने पोलिसांनाच उलट धमकी दिली. इतके करुनही समाधान न झालेल्या या व्यक्तीने पोलीस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्लादेखील केला. परिणामी पोलिसांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्याने त्याचा मृत्यू झाला.
करोना व्हायरसच्या विळख्यात सापडलेल्या फिलिपिन्सने देशात लॉकडाऊन केला आहे. करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने कठोर अंमलबजावणीला सुरुवात केली आहे. लॉकडाऊनचे उल्लंघन करणाजयाला गोळ्या घाला, असा आदेश फिलिपिन्सचे राष्ट्रपती रॉड्रिगो डुटेर्ट यांनी सैन्य आणि पोलिसांना दिला आहे.
अगुसानच्या डेल नॉर्टे प्रांतातील नासीपिट शहरात एका चेकपॉईंटवर या इसमाला रोखले असता तो शिवीगाळ करु लागला. मास्क न घातल्याने तिथल्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्याला विचारणा केली असता, त्याने रागाने कर्मचाऱ्यावर हल्ला केला. त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला.





