दिल्लीतील कोरोनाग्रस्तांमध्ये वाढ मात्र लॉक डाऊन हा पर्याय नाही – मुख्यमंत्री केजरीवाल

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील लॉक डाऊन शिथिल करण्यात आल्यानंतर येथील कोरोनाग्रस्तांच्या संख्येमध्ये वाढ होताना दिसत असून याबाबत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज स्पष्टीकरण दिलं. केजरीवाल यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधताना दिल्लीमध्ये कायमचा लॉकडाउन ठेऊ शकत नाही असं मत व्यक्त केलं असून दिल्लीत निर्बंध शिथील करण्याचे संकेत दिलेत. “कायमचा लॉकडाउन हा पर्याय नाही. काळजी घेत आपल्याला पुढील वाटचाल करावी लागणार आहे,” असं अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं.
Delhi is witnessing a surge in #Covid19 cases, we accept it. But there is nothing to worry about, I assure you that we are fully prepared. We cannot be in a permanent lockdown: Delhi CM Arvind Kejriwal pic.twitter.com/HdAa0GIQzV
— ANI (@ANI) May 30, 2020
देशात कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या दिल्लीमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीकरांशी संवाद साधताना, “करोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचं मान्य आहे. पण आपण घाबरण्याची गरज नाही. करोनाबिधित रुग्णांच्या मृत्यूसंख्येत वाढ झाली आणि रुग्णालयातील बेडची कमतरता भासू लागली तरच दिल्लीमधील परिस्थिती माझ्यासाठी चिंताजनक असेल,” या शब्दांमध्ये आश्वस्त केलं.
यावेळी केजरीवालांनी राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येचा व याविरोधात लढण्यासाठी सज्ज असलेल्या आरोग्य यंत्रणेचा लेखा-जोखा मांडताना “एकूण रुग्णांपैकी २१०० रुगण रुग्णालयात दाखल असून इतर रुग्ण घरी उपचार घेत आहेत. ६५०० बेड सध्या तयार असून ९५०० बेड पुढील आठवड्यात तयार होतील,” अशी माहिती अरविंद केजरीवाल यांनी दिली आहे. “अनेक लोक बरे होत असून, ते आपल्या घऱी आहेत. घाबरण्याचं कोणतंही कारण नाही,” अशी आकडेवारी मांडली.
Out of the total patients, only 2100 are in hospitals rest are undergoing treatment at their homes. 6500 beds are ready till date and 9500 beds will be ready by another week: Delhi Chief Minister Arvind Kejriwal pic.twitter.com/txI2a2xzzj
— ANI (@ANI) May 30, 2020





