Lockdown | कर्नाटकातही लॉकडाऊन?, मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांचा इशारा

बंगळुरू – गरज भासल्यास कर्नाटकमध्ये पूर्ण लॉकडाऊन लावण्यात येईल, असे मुख्यमंत्री बी. एस येडीयुरप्पा यांनी सोमवारी स्पष्ट केले. नागरिकांनी स्वत:च्या भल्यासाठी प्रतिसाद द्यावा. जर त्यांनी स्वत:ला घरात ठेवले नाही तर आम्हाला कठोर निर्णय घ्यावे लागतील. जर गरज भासली तर आम्ही लॉकडाऊन लावू, असे ते म्हणाले.
रविवारी दहा हजारापेक्षा अधिक बाधित कर्नाटकात आढळले. या वाढीविषयी विचारले असता ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आपल्या सरकारने केलेल्या उपाय योजनांबाबत चर्चा झाली आहे. करोनाबाधित वाढत असलेल्या भागात आम्ही रात्रीची संचारबंदी लावली आहे, असे आम्ही त्यांना सांगितले आहे, असे ते म्हणाले.
नागरिकांनी मुखपट्ट्यांचा वापर करावा आणि हॅंड सॅनिटायझर वापरावे याचा आग्रह धरून ते म्हणाले, लोकांनी त्यांच्या भल्याचा विचार करून वागावे. त्यांना शहाणपण येत नसेल तर आम्हाला कडक उपाय योजना कराव्या लागतील. तशी वेळ आमच्यावर जनतेने आणू नये. नागरिकांनी आम्हाला सहकार्य करावे.





