पूनम पांडेच्या विरोधात लॉकडाऊन भंगाचा गुन्हा
Updated On:

मुंबई: मुंबईतील प्रख्यात मॉडेल व अभिनेत्री पूनम पांडे हिच्या विरोधात मुंबई पोलिसांनी काल लॉकडाऊनच्या नियमांचा भंग केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. मरीन ड्राईव्ह पोलिसांनी तिच्या विरोधात हा गुन्हा दाखल केला असून तिच्या समवेत असलेल्या तिच्या एका सहकाऱ्याच्या विरोधातही हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ती या इसमाबरोबर मरिन ड्राईव्ह परिसरात विनाकारण एक अलिशान कारमधून हिंडत होती. म्हणून पोलिसांनी तिला अडवून तिच्या विरोधात हा गुन्हा दाखल केला आहे. धोकादायक रोग प्रसाराच्या विरोधात जारी केलेल्या निर्बंधांचा भंग करणे, सरकारी आदेशांचा भंग करणे इत्यादी कलमांखाली तिच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती त्या ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मृत्यूंजय हिरेमठ यांनी दिली. तिच्याकडे कोणताहीं पोलीस परवाना नव्हता.





