पुणे जिल्हा | चिंबळीतील 231 शेतकर्यांना खरिपासाठी दीड कोटींचे कर्ज
Updated On:

चिंबळी (वार्ताहर) – येथील 231 शेतकर्यांना खरीप हंगामातील पीक कर्जाचे वाटप करण्यात आले असल्याचे संस्थेचे सचिव निलेश देशमुख यांनी सांगितले.
चिंबळी विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या वतीने व पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक चाकण माध्यमातून आमदार दिलीप मोहिते पाटील व विकास अधिकारी राहुल वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच बाजार समितीचे माजी सभापती विलास कातोरे यांच्या विशेष प्रयत्नांतून चिंबळी येथील 231 शेतकर्यांना दीड कोटी रुपये खरीप हंगामातील पीक कर्जाचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी अध्यक्ष अर्जुन अवघडे, उपाध्यक्ष प्रवीण चव्हाण, संचालिका सुमन बनकर, अमृता जाधव-कातोरे, संचालक ज्ञानेशवर जैद, कुंडलिक बनकर, साखरचंद लोखंडे, पंडित कड, हिरामण बहिरट, जीवन जैद, मारुती पाटारे, खंडेराव होळकर, सत्यवान जैद तसेच सर्व संचालक उपस्थित होते.





