गृहनिर्माण सोसायटींच्या स्वयंपुनर्विकासासाठी कर्ज: मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली महत्वाची माहिती

Devendra Fadnavis | पुणे जिल्हा आणि महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट्स महासंघ, सहकारी पतसंस्था महासंघ, सहकारी बँक महासंघ यांच्यावतीने महाराष्ट्रातील गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट्स यांना मार्गदर्शन आणि सहकार्य मिळावे, यासाठी पुण्यात महाअधिवेशन आणि प्रदर्शनाचे आयोजन गणेश कला क्रीडा मंच येथे करण्यात आले होते. या महाअधिवेशन आणि प्रदर्शनाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
राष्ट्रीय सहकार विकास महामंडळ (एनसीडीसी) साखर कारखान्यांना ज्या प्रमाणे कर्ज दिले जाते. त्याच धर्तीवर गृहनिर्माण सोसायट्यांना स्वयंपुनर्विकासासाठी एनसीडीसीकडून कर्ज स्वरूपात पैसे उपलब्ध करून दिले जातील. त्यासाठी केंद्रीय स्तरावरून येत्या तीन महिन्यात एनसीडीसीच्या उपविधींमध्ये बदल केले जातील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्य सरकारी बँकेचे प्रसासकीय प्रमुख विद्याधर अनास्कर, आमदार प्रवीण दरेकर, हेमंत रासने, महासंघाचे अध्यक्ष सुहास पटवर्धन, उपाध्यक्ष सीताराम राणे यावेळी उपस्थित होेते.
#Maharashtra #DevendraFadnavis #Pune pic.twitter.com/JjrK1GiUU9
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 23, 2025
गृहनिर्माण सोसायट्यांनाही एनसीडीसीच्या माध्यमातून कर्ज
पुनर्विकासाला आलेल्या गृहनिर्माण सोसायट्या मोठ्या प्रमाणात शहरी भागातच आहेत. त्यामुळे कर्ज मिळण्यास अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे राज्य बँक आणि मुंबई जिल्हा बँकेकडून स्वयंपुनर्विकासाठीच्या मदतीला एनएसीडीकडून कर्ज उपलब्ध झाल्यास पुनर्विकासाला गती मिळेल, अशी माहिती फडणवीस यांनी यावेळी बोलताना दिली. एनसीडीसीच्या उपविधींमध्ये बदल करणे आवश्यक आहे. ते बदल येत्या तीन महिन्यात होतील. त्यानंतर गृहनिर्माण सोसायट्यांनाही एनसीडीसीच्या माध्यमातून कर्ज पुरवठा करता येईल, असे देखील फडणवीस बोलताना म्हणाले.





