Pune District: गारगोटवाडीत भैरवानथ शाखेतर्फे कर्ज वाटप

कडूस : गारगोटवाडी येथे नव्यानेच भैरवनाथ सहकार विकास संस्थेची नुकतीच स्थापना झाली असून माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्यांदाच 40 सभासदांना रब्बीचे पीक कर्ज स्वरूपात 24 लाखापर्यंत कर्ज वाटप करण्यात आले.
यावेळी विकास अधिकारी एम. बी. ढोरे, बँक व्यवस्थापक माणिक बेंडाले, सचिव स्वप्निल मुसळे, अध्यक्ष बाजीराव गारगोटे, उपाध्यक्ष सावळेराम गारगोटे, माजी सरपंच जितेंद्र काळोखे, संचालक अशोक शिंदे, संचालक संभाजी गारगोटे, संचालक गोरक्ष मुसळे , संचालक साईनाथ गारगोटे, संचालक बाळकृष्ण गारगोटे, संचालक वंदना गारगोटे यांच्या उपस्थितीत कडूस शाखा येथे कर्ज वाटप पार पडले. काही वर्षांपूर्वी महसूल कडूस गावातून गारगोटवाडी विभक्त होऊन,
नव्याने ग्रामपंचायत स्थापन झाल्यानंतर इतर सामाजिक स्वराज्य संस्थाही सुरू करण्याचे प्रयत्न स्थानिक कार्यकर्त्यांनी सुरू ठेवले त्यांच्या या अथक परिश्रमानंतर ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला.
गारगोटवाडी : भैरवनाथ संस्थेद्वारे रब्बी पिकांसाठी कर्ज वाटप करण्यात आले.





